suiside.jpg 
पुणे

स्वतःच्या आयुष्यातून डिस्ककनेट होण्याचा निर्णय घेणारे 'ते' झाले पुन्हा 'कनेक्ट'

ब्रिजमोहन पाटील

पुणे : "मनात खूप काही साठलय, अस्वस्थ होतय पण मनमोकळेपणाने कोणालाच बोलता येत नाही. कामाचे, करियरचे, कर्जाच्या हप्त्याचे खूप टेंशन आल्याने आत्महत्येचा विचार डोक्यात येतो. अशा काळात आपल मत ऐकून घेणारं, त्यावर कोणताही प्रश्न उपस्थित न करणारं, सल्ला देऊन अजून गोंधळात न टाकणारं भेटलं तर किती बरं वाटेल ना. पुण्यात एक संस्था अशाच पद्धतीने काम करत आहे. ती फक्त ऐकून घेते, त्यामुळे आत्तापर्यंत अनेकांनी आत्महत्येचा विचार सोडून दिलाच, पण आता आनंदी आयुष्य जगत आहेत.

'कनेक्ट'ही संस्था आत्महत्या प्रतिबंधक संस्था म्हणून २००५ पासून पुण्यात कार्यरत आहे. हेल्पलाईनच्या व १०० प्रशिक्षीत स्वयंसेवकांच्या मदतीने तणावग्रस्त, नैराश्यग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे अंकुर फुलवत आहे. लाॅकडाउनच्या काळात व्यवहार टप्प झाल्याने अनेकांचा रोजगार बुडाला, मोठ्या प्रमाणात पगार कपात झाली, त्यातच बँकांकडून हप्ते भरा म्हणून तगादा लावला जात आहे. तसेच वर्षभर अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेल्याने, प्लेसमेंट रद्द झाल्याने चिंतेत आहेत.

या दरम्यान, काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर सोशल मिडीयावर "आपण मनातले का बोलू शकत नाही का? ", अशा आशयाची चर्चा सुरू झाली आहे. मनात दबून राहिलेले विचार बाहेर आले की अशा अप्रिय घटना टळू शकतात. या विचाराने 'कनेक्ट'  एनजीओ काम करत आहे.

'कनेक्ट'चे स्वयंसेवक विरेन राजपूत म्हणाले, "आमच्या हेल्पलाईनवर जेव्हा एखाद्याचा फोन येतो तेव्हा आम्ही त्यांचे सहानुभूतीपुर्वक ऐकतो. काही जण १० मिनीट बोलतात, तर काही जण एका तासापेक्षा जास्त काळ, त्यांना हवे तेवढे बोलतात. आमचे प्रशिक्षीत स्वयंसेवक त्यांच्याशी जोडले गेलेले असताना खूप वेळ झाला म्हणून काॅल कट करत नाही. काही जण दुसऱ्या वेळेसही काॅल करतात. मानसिकदृष्ट्या त्रस्त व्यक्तीचे आम्ही फक्त ऐकून घेतो, त्यांना सल्ला देणे, तुम्ही असे का केले, तसे का केले असे प्रश्न विचारून आणखी त्रास देत नाहीत. त्यांच्या मनातील सर्वकाही बाहेर आले की त्यांचे मन आनंदी असते. आमच्या स्वयंसेवकांना ८० तासांचे प्रशिक्षण दिलेले असल्याने ते नियमांचे पालन करतात.
 

'त्या' काॅलमुळे मिळतो आनंद
प्रेम भंग, आर्थिक, कौटुंबिक, नोकरी, व्यवसाययातील तणावातून अनेकजण काॅल करतात. बोलून झाले की फोन ठेवतात. पुन्हा दोन तीन दिवसांनी त्यातील काहीजण आम्हाला तुमच्याशी बोलून छान वाटले. मी आता नैराश्य सोडून दिले आहे. त्यामुळे आत्महत्येचा विचार नाही असे सांगून धन्यवाद देतात. अशा काॅलमुळे आम्हालाही आनंद होतो, असे राजपूत यांनी सांगितले.

१०० स्वयंसेवकांची टीम
दोन हेल्पलाईनवर आमचे स्वयंसेवक दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत उपलब्ध असतात. तसेच ते ससून रुग्णालय, शाळांमध्ये जाऊन समुपदेशन करतात. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केली आहे त्यांनी बोलावले तर हे स्वयंसेवक घरी जाऊन चर्चा करतात.

मन मोकळे करण्यासाठी हे नंबर डाईल करा
९९२२००४३०५
९९२२००११२२
वेळ - दुपारी १२ ते रात्री ८


कनेक्ट संस्थेची स्थापना - २००५
रोजच्या काॅलची संख्या - सुमारे १५
वर्षभरात संपर्क साधणारे - सुमारे ५०००
काॅल करणारा प्रमुख वयोगट - १४ ते ४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT