पुणे

Vidhan Sabha 2019 : मतदारसंघ 21 अन् उमेदवार 373!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरासह जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 444 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 71 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 373 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

शहरातील आठ मतदारसंघात 208 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यात 43 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात सर्वाधिक 27 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.

कसबा पेठेत कमी वयाच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर

विधानसभा निवडणुकीसाठी कसबा पेठ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार नरेंद्र पावटेकर या अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे अर्ज बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवारांनी 19 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. त्यामुळे 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार फैय्याज मुश्‍ताक सय्यद राज यांच्या एबी फॉर्मवर पांढऱ्या शाईने खाडाखोड आणि एकच प्रस्तावक असल्याच्या कारणास्तव तो अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT