Police_Station
Police_Station 
पुणे

हडपसर पोलिस ठाण्याच्या इमारतीचा मार्ग मोकळा; बांधकामाचा लवकरच शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा

हडपसर (पुणे) : गेल्या पाच वर्षात आमचे सरकार गेल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले. त्यांनी माळवाडी येथे शासनाने दिलेल्या गायरान जागेवर हडपसर पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या कामाकडे दुर्लक्ष केले.

मात्र, आता हडपसर पोलिस ठाण्याची सहामजली अशी सर्व सेवा-सुविधायुक्त इमारत लवकरच बांधली जाईल. यासाठी आवश्यक त्या निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ही इमारत पोलिस ठाण्याबरोबरच सहाय्यक आयुक्त कार्यालय, उपआयुक्त कार्यालय आणि गुन्हे शाखेसाठी असणार असल्याची माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली. 

हडपसर पोलिस ठाण्याच्या नियोजित जागेची पाहणी आमदार तुपे यांनी केली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी पोलिस उपआयुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, नगरसेवक योगेश ससाणे, डॉ. शंतून जगदाळे उपस्थित होते. 
उपआयुक्त पाटील म्हणाल्या, पूर्व भागात वेगाने होणारी अनिर्बंध वाढ हडपसर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

सन 2013 मध्ये हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नव्याने मांजरी बुद्रुक, फुरसुंगी, कचरा डेपो, मंतरवाडी फाटा ते कात्रज बायपास मार्गे उंड्रीगाव सीमेपर्यंत हद्द वाढली. त्यामुळे गुन्ह्यांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाण्याला जादा मनुष्यबळ, चौक्या, त्यासाठी लागणाऱ्या इमारती निर्माण केल्या तरच गुन्हेगारीच्या राक्षसाला आळा घालणे शक्य होणार आहे. आमदार तुपे यांनी या प्रश्नात लक्ष घातले असल्याने लवकरच या ठिकाणी सहामजली इमारत उभी होण्यास मदत होईल. 

२०१२ मध्ये माळवाडी येथे पोलिस ठाण्यासाठी पाऊण एकर गायरान जागा मिळाली आहे. याठिकाणी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन देखील झाले होते. कामासाठी निधी देखील उपलब्ध झाला होता. मात्र याठिकाणी असलेल्या वखार मालकाने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हे काम आजतागायत रेंगाळले. मात्र, वखारीची पाच गुंठे जागा सोडून उर्वरीत जागेवर पोलिस ठाण्याची इमारत बांधणार असल्याची माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : पुलवामा येथे बोट उलटली, दोन जण बेपत्ता

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT