पुणे : तीन महिने घर बंद.. तरी देखील साडेनऊ हजार रुपये वीजबिल.. ऑनलाइन वीजबिल भरून देखील पुढील बिलात त्यांची वजावट केलेली नाही... या व अशा असंख्य ग्राहकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे "तक्रारी काही कमी होईना आणि महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रापुढील रांगा काही थांबेना' अशी परिस्थिती सध्या शहरात पहावयास मिळत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 23 मार्चला रात्री बारापासून राज्यात लॉकडाऊन लागू केला. त्यामुळे महावितरणकडून देखील मीटर रीडिंग पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यानंतर चार वेळा लॉकडाऊनची मुदत राज्य सरकारकडून वाढविण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनच्या कालावधी रीडिंग घेणे शक्य न झाल्यामुळे महावितरणने त्या काळातील सरासरी वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मागील वर्षी या महिन्यात वापर झालेले युनिट ग्राह्य धरण्यात आले. दरम्यान लॉकडाऊनच्या कालावधीत महाराष्ट्र वीजनियामक आयोगाने एक एप्रिलपासून राज्यातील वीजदरात वाढ करण्यास मान्यता दिली. त्यामुळे मार्च महिन्यातील युनिटसाठी एक दर, तर एप्रिलपासून वाढीव दर अशामुळे नागरिकांना प्रचंड वीजबिले आली. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू
ग्राहकांच्या तक्रारी विचारात घेऊन महावितरणने 18 जून नंतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्र सुरू केली. परंतु त्यास देखील आता दीड महिना होऊन गेला. अद्यापही वीजबिलाबाबत तक्रारी असलेल्या नागरिकांच्या रांगा वीजबिल भरणा केंद्राबाहेर ग्राहकांच्या रांगा असल्याचे चित्र पाहवास मिळत आहे. तर अनेक ठिकाणी केंद्र ही अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे देखील ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेले तीन महिने घर बंद होते. तरी देखील साडेअकराशे युनिट वीज वापर झाला, असे गृहीत धरून साडेनऊ हजार रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले आहे. दुरुस्त करून मिळावे, यासाठी जावे तर केंद्र बंद असते.
- आशिष पटेल (बालाजीनगर)
तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन बिल भरले होते. आता जे बिल आले आहे. त्या मधून ते वजा करणे अपेक्षित होते. परंतु भरलेली रक्कम वजा न करता वीजबिल पाठविले आहे.
- मनोहर दुबे (धनकवडी)
पुण्याला मिळणार चोवीस तासांचे प्रभारी जिल्हाधिकारी?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.