Mahavitaran 
पुणे

वीजग्राहकांनी एका महिन्यात भरले तब्बल एवढे कोटी

सकाळवृत्तसेवा

पुणे - वीजबिलावरून एकीकडे गोंधळ सुरू असताना दुसरीकडे मात्रे गेल्या महिन्याभरात पुणे परिमंडलात 14 लाख 30 हजार वीजग्राहकांनी 356 कोटी 45 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला असल्याचे समोर आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महावितरणकडून मीटर रिडींग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र जून महिन्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीच्या रिडींगनुसार वीजबिल दिल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक कार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉट्‌स ऍप ग्रुप आदींद्वारे शंका निरसनाचे काम सुरु केले आहे. गेल्या महिन्याभरात पुणे शहरात 8 लाख 55 हजार 500 ग्राहकांनी 207 कोटी 72 लाख, पिंपरी चिंचवड शहरात 3 लाख 69 हजार ग्राहकांनी 100 कोटी 11 लाख आणि मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्‍यातील 2 लाख 6 हजार ग्राहकांनी 48 कोटी 62 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे. 

घरगुती वीजग्राहकांनी जूनमध्ये एकत्रित आलेल्या तीन ते चार महिन्यांच्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. वीजबिलाच्या पडताळणीसाठी गेल्या तीन ते चार महिन्यांचा संपूर्ण हिशेब https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे. एकाही पैशाचा अतिरिक्त भूर्दंड वीजग्राहकांवर जूनच्या बिलामध्ये लावण्यात आलेला नाही. ग्राहकांकडे असलेल्या मीटरचे रिडींग घेतल्यानंतर अचूक वीजवापराचे बिल तयार करण्यात आले आहे व बिलामध्ये स्लॅब बेनिफीट व स्लॅबनुसार दर आकारणी करण्यात आली आहे. 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु झाले आहेत. तथापि, ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरणा करण्यासाठी 'ऑनलाईन'ची सोय उपलब्ध आहे. क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी 'ऑनलाईन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. तसेच 'ऑनलाईन' बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ग्राहकांनी विजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

Vaibhav Sooryavanshi : वैभवला पुन्हा संधी केव्हा मिळणार? गौतम गंभीरच्या उत्तराने सारेच गार; संजू सॅमसनचं नाव घेऊन विषयच संपवला

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Andheri Accident: अंधेरीत गोखले पुलावर दोन वाहनांची धडक, एकमेकांवर आदळल्यानं कारचा चुराडा; Video Viral

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT