PMPML Bus Accident News 
पुणे

Pune News : दोन PMPML बसमध्ये सापडून कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू; कात्रजमधील घटनेने परिसरात हळहळ

PMPML Bus Accident News : ही दुर्घटना घडताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अशोक गव्हाणे

कात्रज, ता. ११ : दोन पीएमपीएल बसमध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ११) दुपारी कात्रज चौकात घडली. कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पीएमपीची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

गणेश गुजर (वय ४२) रा. कोथरूड, मुळ गाव भोर असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. गुजर हे कंत्राटी मकॅनिक कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते. कात्रज हिंजवाडी बस बंद पडल्याने ती बस दुसऱ्या बसद्वारे टोईंग करुन बाजूला घेत होते. बस बाजूला घेताना टोईंग करण्यासाठी लावलेला रॉड सुटून दोन बसमध्ये सापडून कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

ही दुर्घटना घडताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. बस बंद पडलेली असताना पीएमपीएल प्रशासनाने ती बस टोईंग व्हॅनने टोईंग न करता बसणे का टोईंग केली? टोईंग करताना योग्य ती काळजी का घेण्यात आली नाही? असा प्रश्न नागरिकांकडून यानिमीत्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: दिल तो बच्चा है! संघ हरताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला... KKR च्या सदस्याने काय केलं पाहा Viral Video

Konkan Agriculture: सुपारी उत्पादनाचा पर्यायही घाट्यात; निम्म्यापेक्षा जास्त घट, शासनदरबारी उपेक्षित, खर्च वाढताच

विठुरायाच्या नैवेद्यात उन्हाळी गोडवा! अक्षय तृतीया ते वटपोर्णिमेपर्यंत दररोज आमरस-पूरीचा समावेश

म्हाडाच्या ‘कोकण मंडळा’तील कर्मचाऱ्यांवर ताण, पदे रिक्त असल्याने समस्या

Delhi Punjab Pollution: ‘आयआयटीएम’चा अहवाल धक्कादायक; दिल्ली-पंजाबमधील प्रदूषणामुळे तापमानवाढीचा धोका वाढला, दिल्ली, तातडीच्या उपायांची गरज!

SCROLL FOR NEXT