corona  
पुणे

सावळागोंधळ, पुण्यात आणखी एका महिलेच्या स्वॅबचे रिपोर्ट परस्परविरोधी   

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एका सत्तर वर्षीय महिलेचे कोरोनाचा संसर्ग  तपासणीसाठी पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवलेल्या स्वॅबचे (घशातील द्राव) अहवाल परस्परविरोधी आले आहेत. 

उरुळी कांचन येथील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा कोरोना संसर्ग तपासणीसाठी घेतलेला स्वॅबचा घोळ मागिल तीन दिवसांपासून चालु असतानाच लोणी काळभोर येथील महिलेच्या स्वॅबच्या अहवालाबाबतही शंका निर्माण झाली आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एका सत्तर वर्षीय महिलेला पोटात वेदना होत असल्याने बुधवारी (ता. १०) सकाळी लोणी काळभोर हद्दीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

या महिलेवर उपचार करण्यापूर्वी संबधित महिलला कोरोनाची लागण झाली की नाही, याची तपासणी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने महिलेचा स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवला होता. तेथे तो पॉझिटिव्ह आला होता. मात्र, या महिलेच्या नातेवाइकांनी तो रिपोर्ट नाकारात संबधित महिलेचा स्वॅब शुक्रवारी (ता. १२) सकाळी हडपसर येथील खासगी प्रयोगशाळेत पाठवला होता. राष्ट्रीय विषाणू संस्थेने महिलेचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटीव्ह दिला असला, तरी हडपसर येथील प्रयोगशाळेने मात्र संबधित महिला कोरोनाबाधित नसल्याचा रिपोर्ट दिला आहे. 

लोणी काळभोर येथील महिलेप्रमाणेच उरुळी कांचन येथील राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा कोरोना संसर्ग तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचे पाचपैकी तीन रिपोर्ट निगेटीव्ह, तर दोन रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. विशेष बाब म्हणजे या दोन्ही महिलांचे स्वॅब रिपोर्ट देणाऱ्या दोन्ही खासगी प्रयोगशाळा पुणे महानगरपालिकेशी कोरोना काळात स्वॅब तपासणीसाठी टायअप झालेल्या आहेत. दरम्यान, उरुळी कांचन येथील राजकीय महिला पदाधिकाऱ्याने शुक्रवारी रात्री पुण्यातील खासगी प्रयोगशाळेच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.

याबाबत लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी ड़ॉ. डि. जे. जाधव यांनी सांगितले की, लोणी काळभोर येथील एका सत्तर वर्षीय महिलेचे कोरोनाचा संसर्ग तपासणीसाठी पुणे शहरातील दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळेत पाठवलेल्या स्वॅबचे अहवाल परस्परविरोधी आले आहेत, ही बाब खरी आहे. संबधित महिलेला कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांच्या विनंतीनुसार संबधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. मात्र, संबधित महिलेला घऱीच थांबण्यास सांगितले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT