पुणे - एफटीआयआयच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प साकारण्यात आले आहे. त्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे - एफटीआयआयच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प साकारण्यात आले आहे. त्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते करण्यात आले. 
पुणे

हिंदी भाषेच्या प्रसारासाठी चित्रपट क्षेत्राचे योगदान - भगतसिंह कोश्‍यारी

सकाळवृत्तसेवा

पुणे - हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश-विदेशात होण्यासाठी चित्रपट क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्त केले.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प साकारले आहे. त्याचे अनावरण कोश्‍यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक भूपेंद्र कॅंथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आदी उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘नभ अभीप्सा’ धातुकला शिल्प हे जुन्या व निर्जीव साहित्यांपासून सुंदर कलाकृती उभारणी केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना  कोश्‍यारी म्हणाले, ‘‘दूरदर्शन व इतर माध्यमातून या सुंदर कलाकृतीचा प्रसार करा, ज्यामुळे विश्वातील लोक येथे ही कलाकृती बघण्यासाठी येतील. या संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना देशभरासह विश्वातील अनेक मान्यवर आले पाहिजेत.

कॅंथोला म्हणाले, ‘‘माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रपट शिक्षणाची पुणे ही काशी आहे. चित्रपट क्षेत्र हे कला व विज्ञान यांचा अद्‌भुत संगम आहे.’’

कोश्‍यारी यांनी सुरवातीला ऐतिहासिक प्रभात स्टुडिओमधील जुने व नवीन प्रकारचे कॅमेरे, लाइट तसेच चित्रपट निर्मिती विषयक दुर्मिळ साहित्यांची पाहणी केली. त्यांच्या हस्ते कला दिग्दर्शन विभागप्रमुख प्रसन्न जैन आणि कला निर्मिती विभागप्रमुख विक्रम वर्मा यांच्या संकल्पनेतून ‘नभ अभीप्सा’ हे शिल्प साकारल्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT