The Corona crisis on Baramati continued until the report of twelve people declare 
पुणे

Corona Virus : बारा जणांचे रिपोर्ट येईपर्यंत बारामतीवरील कोरोनाचे संकट कायमच

मिलिंद संगई, बारामती

बारामती : कोरोनाबाधित रुग्णाशी संबंधित बारा नातेवाईकांना पुण्याच्या औंध रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य निरिक्षक डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या बारा नातेवाईकांचे रिपोर्ट येत नाहीत तोवर बारामतीकरांवरील कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे संकट कायमच असल्याची आजची स्थिती होती. दरम्यान ज्या रुग्णाला
 कोरोना झाला आहे, त्या रुग्णाने गेल्या तीन चार महिन्यात प्रवासही केलेला नाही किंवा तो बाहेरही कोठे गेलेला नव्हता, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितल्याने प्रशासनाची चिंता अजूनच वाढली आहे. जर हा रुग्ण बाहेरच गेलेला नसेल तर त्याला घरातच त्याच्या संपर्कात असलेल्या कोणाकडून तरी कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाने त्या दृष्टीने आता शोधमोहिम चालविली आहे. 

coronavirus: आजपासून बारामतीकरांची खरी परिक्षा! 
दरम्यान समर्थनगर भागातील वाहतूक पोलिसांनी आज अत्यावश्यक सेवा वगळता थांबविली होती. आजपासून भाजी, फळे, मटण, चिकन व मासळीबाजारही बंद ठेवण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे बंदच राहणार आहे. लोकांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे. दुसरा कोरोनाचा रुग्ण बारामतीत सापडल्यावर शहरातील पोलिस बंदोबस्तातही वाढ करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. 

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक
दरम्यान आज आयएसएमटीचे उपाध्यक्ष किशोर भापकर यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर भापकर मित्रमंडळाच्या वतीने आज एक लाख रुपयांचे जीवनाश्यक वस्तूंचा साठा असलेले किट उपविभागीय अधिका-यांकडे सुपूर्द केले गेले. या किटमध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर, मीठ, रवा, पोहे, टूथपेस्ट, साबण अशा वस्तू या किटमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक
येथील श्री मुनिसुव्रत महाराज दिगंबर जैन देवस्थान व पुलक मंचच्या वतीने गरजू नागरीक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. नगरपालिका तसेच एमआयडीसीत बाहेरु आलेले कामगार व गरजूंना पॅकेटद्वारे जेवण पुरविले जात असल्याचे जवाहर वाघोलीकर यांनी सांगितले. टीसी महाविद्यालयाचे कँटीन मालक व कर्मचारी हे काम करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT