corona-k.jpg 
पुणे

भोर : अन् त्यांच्यावर ग्रामस्थांनी केला फुलांचा वर्षाव...

सकाळवृत्तसेवा

नसरापूर : नसरापूरमध्ये 3 मे रोजी अढळलेल्या कोरोनाग्रस्त पती पत्नी उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून, यामुळे भोर तालुका देखील कोरोनामुक्त झाला आहे. दांपत्याचे आज (ता. 17) रोजी त्यांचे नसरापूर येथे आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत करुन आनंद व्यक्त केला. 

नसरापूर येथे 3 मे रोजी कोरोनाग्रस्त व्यक्ती अढळल्यानंतर दुसरयाच दिवशी त्यांची पत्नी देखील कोरोना पाँझिटिव्ह आढळल्यानंतर दोघांवर पुणे येथे उपचार चालू होते पंधरा दिवसाच्या उपचारानंतर दोंघांच्याही इतर सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्याने त्यांची आज रविवार (ता.17 रोजी) रुग्णालयातून मुक्तता करण्यात आली.

भोर आरोग्य विभागाच्या वतीने त्यांना नसरापूर येथे आणण्यात आले, यावेळी ते राहत असलेल्या गृहरचनासंस्थेच्या आवारात प्रशासन व रहिवाश्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती लहुनाना शेलार, मंडलाधिकारी एस. बी. कंडेपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, नसरापूरचे सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, स्वप्नलोक गृहरचना सोसायटीचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष गणेश बागल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 सोशल डिस्टन्सचे पालन करुन यावेळी पती पत्नीचे स्वागत करण्यात आले, तर सोसायटी मधील रहिवाशांनी आपापल्या घराच्या गॅलरीमधून फुले उधळून तसेच घंटानाद करुन स्वागत केले. कोरोनामुक्त उभयतांचे डोळे यावेळी भरुन आले होते, सर्वांनी केलेल्या स्वागताचा स्विकार करुन सर्वांचे अभार व्यक्त केले.

विठ्ठल आवाळे यांनी यावेळी नसरापूर कोरोनामुक्त राहण्यासाठी ग्रामस्थांसह आरोग्य विभाग प्रशासन, ग्रामपंचायत यांनी कशोशीने प्रयत्न करुन यश मिळवल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. गणेश बागल यांनी सोसायटीच्या सर्व रहिवाशांनी नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्याने नविनरुग्ण आढळले नसल्याने सर्वच रहिवाशी या य़शाचे मानकरी असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray CJP protest : आदित्य ठाकरे निवडणूक आयुक्तांना थेट गद्दार म्हणाले, ‘गद्दार ज्ञानेश गेलेच पाहिजेत’; CJPच्या आंदोलनाला पाठिंबा

Pune News : पुणे महापालिकेचा कारभार 'रामभरोसे'; प्रमुख अधिकारी, पदाधिकारी परदेशात

Cockpit attack: 'मोठी किंमत मोजावी लागेल', कॉकपिट घटनेवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा

Alandi News : 36 विद्यार्थी सुखरूप आळंदीत परतले; पोलीस ठाण्यात पालकांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

SCROLL FOR NEXT