Corona Test 
पुणे

बारामतीतील कोरोनाबाधित महिलेला वाहनातून आणणारा चालक.... 

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्‍यात करंजेपूल येथील कोरोनाची बाधा झाल्याचा संशय असलेला एक रुग्ण निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सोमेश्‍वरनगर परिसराला दिलासा मिळाला आहे. 

वडगाव निंबाळकर येथे मुंबईवरून आलेली एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. या महिलेला वाहनाद्वारे मुंबईतून वडगाव निंबाळकरपर्यंत आणणारा वाहनचालक बारामती येथे आरोग्य विभागाद्वारे क्वारंटाइन करण्यात आला होता. त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. करंजेपूल ही परिसरातील पंधरा- वीस गावांची महत्त्वाची बाजारपेठ आहे. मागील आठवडाभर पेठ गर्दीने ओसंडून वाहत होती. आधीच मुर्टी येथे आढळलेला रुग्ण या पेठेत खरेदी करून गेल्याचे समजल्याने लोक धास्तावले होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशात कोरोना संशयित चालक करंजेपूल येथेच मोठ्या सोसायटीत राहणारा होता. शिवाय त्याची पत्नी एका कंपनीमध्ये; तर त्याचा मुलगा एका किराणा दुकानांमध्ये काम करत होता. त्यामुळे सदर चालक पॉझिटिव्ह निघण्याच्या भीतीने परिसर अक्षरशः गॅसवर होता. करंजेपूल, वाणेवाडी या पेठ तीन- चार दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, सुदैवाने तो निगेटिव्ह आला. त्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आहे. या अहवालाने सोमेश्‍वरनगर परिसरात अद्याप एकही संशयित रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
दरम्यान, परिसरात पुणे- मुंबईहून आलेल्या नागरिकांनी चौदा दिवस घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य सेवक करत आहेत.


करंजेपूल येथील संशयित रुग्ण निगेटिव्ह आला आहे. त्यास बारामती येथे सरकारी व्यवस्थेकडे क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
- डॉ. मनोज खोमणे
तालुका आरोग्य अधिकारी, बारामती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची सुटका होणार, गृहमंत्रालयाकडून आदेश जारी; 'रासुका'वरही केंद्राचा युटर्न

मालिकेत एकमेकांच्या तालावर नाचणाऱ्या सायली आणि प्रियाने चक्क कोळीगीतावर लगावले ठुमके; व्हिडिओ व्हायरल

Gas Cylinder Scam : ‘LPG सिलेंडर हवा आहे का?’ अशा प्रकारच्या 'या' 5 व्हॉट्सॲप मेसेजपासून सावध; एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

Latest Marathi News Live Update : जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये घरगुती गॅसचा वापर

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

SCROLL FOR NEXT