CoronaVirus_Report
CoronaVirus_Report 
पुणे

धक्कादायक! दौंडमध्ये कोरोना तपासणीचे रिपोर्ट झाले व्हायरल!

सकाळ वृत्तसेवा

दौंड (पुणे) : दौंड शहरात ४५ वर्षीय कोरोनाबाधित तरूणाच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहिलेल्या एका ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची बाधा झाली आहे. अंत्यविधीस उपस्थित ४८ नागरिकांपैकी ४४ जणांचा अहवाल आला असून, ४ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान या ४४ नागरिकांचे स्वॅब टेस्ट रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.  

दौंड-सिद्धटेक रस्त्यालगत गोवा गल्ली शेजारील भागात ७० वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा २५ मे रोजी मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी पुणे येथे गेलेल्या त्यांच्या ४८ वर्षीय मुलाला व ३२ वर्षीय जवळच्या नातेवाईकास कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचबरोबर या ७० वर्षीय मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सिंधी गल्ली मधील ४५ वर्षीय तरूणाचा १ जून रोजी मृत्यू झाला. या तरूणाच्या अंत्यसंस्कारासाठी भीमा नदीकाठी १५० पेक्षा अधिक लोक जमा होऊन अंत्यविधी होईपर्यंत थांबले होते.

उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने ३ जून रोजी अंत्यविधीस उपस्थित ४८ जणांचे घशातील द्रव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पाठविण्यात आले होते. गुरुवारी (ता. ४) त्यापैकी ४४ जणांचा अहवाल आला असून एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. 

दरम्यान, गुरुवारी (ता.४) सायंकाळी ४४ जणांचा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (एनआयव्ही) आलेला दोन पानी स्वॅब टेस्ट अहवाल सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. रिपोर्टमध्ये ज्यांचे स्वॅब घेण्यात आले त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, वय, लिंग, आदींचा तपशील आहे. त्यामुळे रूग्णाच्या नावाच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. ४४ पैकी १ ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधित असून त्यांची बहुतांश माहिती उघड झाली आहे. 

चौदा जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात
मृत तरूणाचे कुटुंबीय, उपचार करणारे डॅाक्टर व त्यांच्या रूग्णालयातील कर्मचारी, अंत्यविधीस उपस्थित असलेले नागरिक असे एकूण ४८ जणांपैकी १४ जणांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. तर उर्वरित ३४ जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT