Pune-Seal 
पुणे

पुण्यातील रेड लाइट एरियातही कोरोनाने केली एन्ट्री; 'इतक्या' जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिका आणि पोलिस प्रशासनाचे चोख नियोजन आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी पाळलेली स्वयंशिस्त यामुळे आतापर्यंत शहरातील रेड लाइट एरियात कोविड-19 चा फैलाव होण्यापासून थांबवण्यात यश आले होते. मात्र, आता बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय परिसरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. तेथील दोन महिला आणि तीन पुरुषांची कोरोना टेस्ट शनिवारी (ता.२५) संध्याकाळी पॉझिटिव्ह आली आहे.

या दोन्ही महिला वेश्या व्यवसाय करतात, तर पुरुष त्याच भागात राहणारे असून ते फेरीवाले आहेत. गेले चार महिने या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात येथील निर्बंध कमी करण्यात आले होते. त्यामुळे येथील जीवनमान सुरळीत सुरू झाले होते. तर महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला होता. मात्र, आता याठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याने रेड लाईट एरिया पुन्हा बंद केला, तर आम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाचं काय होईल? असा प्रश्न येथील महिलांना पडला आहे .

मार्चमध्ये संचारबंदी लागू झाल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून हा भाग पत्रे लावून सील करण्यात आला होता. या काळात रेड लाईट भागातील महिलांनी पोलिसांना आणि येथील मंडळाच्या कार्यकर्त्याना सहकार्य केले. तेथील महिलांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दूध, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.

एक महिला चार महिन्यांची गर्भवती :
अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही महिलांचे वय ३५ च्या घरात आहे. सुदैवाने त्यांना कोणतेही आजार नाहीत. मात्र त्यातील एक महिला ही चार महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे किमान तिला तरी अॅडमिट करून घेऊन तिच्यावर उपचार करणे गरजेचे आहे, असे 'कायाकल्प'च्या प्रकल्प प्रमुख सारिका लष्करे यांनी सांगितले.

लक्षणे आढळून आल्याने आम्ही या पाचही जणांना नायडू रुग्णालयात पाठवले होते. त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी त्यांना होम क्वॉरंटाइन होण्याचा सल्ला दिला आहे. मात्र या सर्वांची घरे खूप छोटी आहेत. कुटुंबातील इतर व्यक्ती तिथे राहतात. त्यामुळे या सर्वांच्या उपचारासाठी प्रशासनाने रेड लाईट एरियातच कोविड केअर केंद्राची उभारणी करायला हवी. तसेच येथील सर्वांची टेस्ट करावी. 
- सारिका लष्करे, प्रकल्प प्रमुख, कायाकल्प

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT