corona
corona 
पुणे

नारायणगावात कोरोनाबाधिताने केली खरेदी, व्यापाऱ्यांनी घेतला... 

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातील बस्ती सावरगाव येथील कोरोनाबाधित रुग्ण कपडे व इतर साहित्य खरेदीच्या निमित्ताने नारायणगाव येथील व्यापाऱ्यांच्या संपर्कात आला आहे. त्यामुळे नारायणगाव व वारुळवाडी ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे नारायणगाव येथील दुकाने उद्यापासून (ता. 26) जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती सरपंच योगेश पाटे यांनी दिली. 

जुन्नर तालुक्‍यातील मुंबई येथून आलेले व होम क्वारंटाइन असलेले धोलवड व बस्ती सावरगाव येथील प्रत्येकी दोन, अशा चार जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, कोरोनासदृश आजाराने भटकळवाडी येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेल्या जुन्नरकरांची चिंता वाढली आहे. 

नारायणगाव ही व्यापारी बाजारपेठ आहे. त्यामुळे खरेदीच्या निमित्ताने तालुक्‍यातील नागरिकांचा संपर्क या भागात जास्त असतो. बस्ती सावरगाव येथील दांपत्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीने नारायणगाव बाजारपेठेत कपडे व इतर साहित्य खरेदी केल्याचे आज निष्पन्न झाले. त्यामुळे नारायणगाव व वारुळवाडी ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली असून, नारायणगाव येथील दुकाने उद्यापासून 1 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशनने घेतला. 

याबाबत सरपंच पाटे व वारूळवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे म्हणाले, ""मागील दहा दिवसांत पुणे व मुंबई येथून सुमारे एक हजार व्यक्ती नारायणगाव व वारूळवाडी भागांत दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 52 जणांना संस्थात्मक क्वारंटाइन व इतरांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

पाच जणांना कोरोनासदृश लक्षणे 
वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ म्हणाल्या, ""होम क्वारंटाइन असलेल्या वारूळवाडी व धनगरवाडी येथील पाच जणांना ताप व इतर कोरोना सदृश लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. वारंवार सूचना देऊनसुद्धा होम क्वारंटाइन व्यक्ती नियमांचे पालन करत नाहीत.'' 

बारा जणांवर गुन्हा दाखल 
डिंभे डावा कालव्यात बारा जण पोहत असल्याचे काल दुपारी आढळून आले आहे. पोलिस आल्याचा सुगावा लागताच ते पसार झाले. या पैकी सुनील कुतळ याच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT