corona
corona 
पुणे

पुरंदर तालुक्यात कोरोनाची उसळी, या 23 गावांत आढळलेत रुग्ण

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात कोरोनाने आज पुन्हा उसळी मारली. शहरात कोरोना पाॅझिटिव्ह दिवसात 12 सापडले. तर, ग्रामीणमध्ये वाल्हे येथे एक आढळला. असे एकूण 13 रुग्ण तालुक्यातील आज सापडले. त्यामुळे तालुक्यातील तब्बल 23 गावांत कोरोना संसर्ग पोचला आहे.

पुरंदर तालुक्याची आजच्या 13 रुग्णांसह संख्या 132 वर पोचली. एकटे सासवड आज 12 पाॅझिटिव्हसह 93 वर गेले. त्यामुळे शतकाकडे निघालेल्या या शहराची परिस्थिती गंभीर बनली आहे. लाॅकडाउन पुढे वाढविला नाही; तर नियंत्रण राहणार नाही,  हे स्पष्ट आहे. आज सासवड शहरातील खंडोबानगर, एसटी स्थानकमागे, गिरमे गल्ली, जय महाराष्ट्र चौक, सोपाननगर आदी भागात रुग्ण आढळून आले. पण, छोट्या लांडगे गल्लीत आज पुन्हा पाच रुग्ण सापडले. 

सासवड शहरातल्या एकूण 93 रुग्णांमधील एकट्या लांडगे गल्लीतील आजच्या पाचसह 35 रुग्ण आहेत. या गल्लीतील अनेक होम क्वारंटाइन लोकही फिरताना दिसतात, अशी तक्रार आल्याने गुन्हे दाखल करणार आहे, असे पालिका मुख्याधिकारी विनोद जळक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी आमदार संजय जगताप म्हणाले की, सासवड शहरातील सर्वच लोकांनी सुजाणपणा दाखवावा, निष्काळजी लोकांनी शहाणे व्हावे कोरोनाबाबतची शिस्त बारकाईने अंमलात आणा. नाहीतर माफी नाही. या वेळी तहसीलदार रुपाली सरनौबत, सासवडचे पालिका मुख्याधिकारी विनोद जळक, तालुका गट विकास अधिकारी मिलिंद टोणपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल शिंदे आदी उपस्थित होते.

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग
 
दरम्यान, आज तालुक्यातील ग्रामीणमधील वाल्हे येथे एक पाॅझिटिव्ह सापडला. विशेष म्हणजे गुरोळी, मांढर व सासवड पाठोपाठ धनकवडीचा तालुक्यातील कोरोनाबाधीतचा चौथा बळी गेला. काल रात्री केतकावळे येथील कोरोना पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात एकाचा मृत्यू झाला. त्याचा कोरोनाबाबत रिपोर्ट येणे बाकी आहे. 

सासवडचा लाॅकडाउन थोडा फायदेशीर ठरतोय, असे वाटतेय.  त्यातून सासवड शहरातील लाॅकडाऊन पंधरा दिवस पुढे नेण्यासारखी दुसरी उपाययोजना हातात नाही. तसेच, पुणे व बाहेर गावाहून ये- जा करणाऱ्यांना होम क्वारंटाइन पद्धतीत रोखले तर नियंत्रण मिळण्याच्या आशा आहेत. शिवाय ग्रामीण भागात 23 गावात कोरोनाचा शिरकावा झाला आहे, तोही रोखला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT