haveli taluka 
पुणे

हवेली तालुक्यातील रुग्ण म्हणतात, कोणी बेड देता का बेड...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी बुद्रुकसह पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधित रुग्ण व रुग्णांच्या संपर्कात आलेले जवळचे (हायरिस्क) नातेवाईक, अशा शंभरहून अधिक जणांना मागिल तीन दिवसांपासून उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाईकांनी लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाकडे उपचारासाठी कोणी बेड देता का बेड, अशी हाक मारण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने दहा दिवसांपूर्वी हवेली तालुक्यातील विविध बारा खासगी रुग्णालयातील सतराशेहून अधिक बेड अधिगृहीत करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सतराशे बेड अधिग्रहीत करण्यात आल्याची घोषणा दहा दिवसानंतरही हवेतच फिरत आहे. पूर्व हवेलीतील एकाही खासगी रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णासाठी बेड उपलब्ध करून दिले नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णाला एकीकडे उपचारासाठी बेड उपलब्द होत नाही, तर दुसऱ्या बाजुला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शेजाऱ्या-पाजऱ्यांना समजल्याने घरीही थांबता येत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाईकांची दुहेरी कुचंबना होत आहे.  त्यातच खासगी रुग्णालयात उपचाराचे पैसे पेड करण्याची तयारी दाखवूनही बेड शिल्लक नसल्याचे सांगत उपचार करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव उपचाराविना घरीच रहावे लागत असल्याची गंभीर बाब मागिल तीन दिवसात पुढे आली आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, ही आशा मावळली आहे. 

पूर्व हवेलीमधील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने दहा दिवसांपूर्वी विश्वराज (लोणी काळभोर), चिंतामणी (उरुळी कांचन), प्रयागधाम (कोरेगाव मूळ), शिवम (कदमवाकवस्ती) या रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयातील एकूण बेडसंख्येच्या ८० टक्के बेड कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हा परिषदेच्या ताब्यात घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर अद्यापही वरील एकाही रुग्णालयाने आरोग्य विभागाच्या बेड ताब्यात दिलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्द होत नाहीत. मागिल तीन दिवसाचा विचार केल्यास, पूर्व हवेलीमधील रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या नातेवाईकांना होम आयसोलेशनसाठी बेड उपलब्द होत नाहीत. त्यामुळे शंभरहून अधिक जण वेंटिंगवर आहेत.  

याबाबत हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले की, पूर्व हवेलीमधील रुग्णांना पुरेसे बेड मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. खासगी रुग्णालयातील बेड पुढील एकदोन दिवसात मिळतील, अशी अपेक्षा आहे. वाघोली येथील जैन कॉलेज व लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेची वसतिगृह ताब्यात घेण्याबाबच चर्चा चालू आहे. वाघोली येथील वसतिगृहात दोनशेहून अधिक रुग्णांची सोय होणार आहे. तर, एमआयटी संस्थेच्या वसतिगृहात चारशेहून अधिक रुग्णांची सोय होऊ शकते. 

पूर्व हवेलीत कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या नागरिकांना पुरेसे बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व नातेवाईक अशा शंभरहून अधिक जणांची दयनीय अवस्था झाल्याची चर्चा कानावर आली आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी व शल्यचिकीत्सक अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्यानेच वरील परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. याबाबत आजच पालकमंत्री अजितदादा पवार व जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार आहे. तसेच, पुढील चोविस तासात परिस्थितीत कसा फरक पडेल, याकडे लक्ष देणार आहे.
 - डॉ. अमोल कोल्हे
खासदार  

Edited by : Nilesh Shende
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT