Corona pulls on head How do we live grievances expressed by laborers sakal
पुणे

कोरोनाने डोके वर काढलंय आम्ही जगायचं कसं; मजुरांनी व्यक्त केल्या व्यथा

मजुरांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती बिकट

अशोक बालगुडे

-३०० मजूर थांबतात रोजगारासाठी

-दररोज रोजगार मिळत नसल्याने कुचंबना

-रोजगार कमी असूनही वाढते मजुरांची संख्या

-कोरोना आणि रोजगाराची भीती वाढली

उंड्री : कोरोनाचे(Corona) नाव घेतले तरी धडकी भरत आहे. मागिल दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे उपासमारीची वेळ(starvation) आली होती, आता कुठे तरी सावरत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे आम्ही जगायचं कसं, आम्हाला रोजगार कसा मिळणार अशी चिंता उंड्री चौकातील मजूर अड्ड्यावरील मजुरांनी व्यक्त केली.

(कात्रज-मंतरवाडी बायपास रस्त्यावरील उंड्री (ता. हवेली) चौकातील मजूर अड्ड्यावर सुमारे दोन-अडीचशे महिला-पुरुष मजुरीसाठी थांबतात. महाराष्ट्रातून परभणी, सोलापूर, जालना, नांदेड, लातूर, मुखेड, देगलूर, छत्तीसगड, तर महाराष्ट्राबाहेरील छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग रोजगारासाठी येथे आला आहे. कोरोना महामारीमुळे ओस पडलेल्या मजूर अड्ड्यावर आता रोजगार मिळू लागला होता. मात्र, मागिल चार-पाच दिवसांपासून कोरोनाने डोके वर काढल्यामुळे आमचा रोजगार बंद होणार आणि पुन्हा उपासमारीचीच येणार का, असा सवाल मजुरांकडून उपस्थित केला जात आहे.

गजानन विनायकराव कदम (रा. उंड्री, ता. हवेली, मूळ जि. परभणी), हिरामण चव्हाण (रा. उंड्री, ता. हवेली, मूळ- उस्मानाबाद), प्रकाश मनोहर घाटे (रा. उंड्री, ता. हवेली, मूळ- देगलूर, जि. नांदेड), सुरेश रामा (रा. उंड्री, ता. हवेली, मूळ- परभणी) म्हणाले की, दररोज सकाळी ३०० महिला-पुरुष रोजगारासाठी थांबतात. दुपारी बारा-एक वाजेपर्यंत रोजगार मिळेल अशा आशेने थांबतात आणि निराश होऊन घरी जातात. अशी परिस्थिती मागिल कोरोनापासून सुरू झाल्याची व्यथा मजुरांनी मांडली.

उंड्री चौकातील मजूर ज्ञानेश्वर कांबळे (वय ४०, रा. उंड्री, ता. हवेली, मूळ गाव- आंबुलगा, ता. मुखेड, जि. नांदेड) म्हणाले की, कोरोना महामारीच्या भीतीमुळे कामे निघत नाही. दररोज मजूरांची वाढ होत आहे, त्यामुळे रोजगार मिळत नाही. ठेकेदार आला की, त्याला मजूर गराडा घालतात. त्याला एका मजुराची गरज असते, त्यासाठी २०-२५ मजूर जमा होतात. त्यामुळे पुरेसा रोजगारही मिळत नाही, उलट हेळसांड होते. त्यामुळे शासनाने आम्हाला कमीत कमी रोजगार मिळेल यासाठी उपाययोजना करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यानंतर उंड्री चौक आणि परिसरातील मजुरांना तीन महिने दररोज सायंकाळी जेवणाची व्यवस्थाकेली. त्याचबरोबर सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायर देऊन आरोग्याची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, असे मार्गदर्शन केल्याचे राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस 'ड्राय डे'; कोणत्या भागात मद्यविक्री कधी बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्चे तेल 100 डॉलरवर! मुंबई-नागपूर-पुणेसह महाराष्ट्रात आता पेट्रोल-डिझेल कितीला?

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : सतीश जारकीहोळी यांच्या घरावर ईडीची छापेमारी

SCROLL FOR NEXT