corona
corona  
पुणे

अरे रे, सैनिकांचे गाव असलेल्या पुरंदरच्या या दुर्गम भागातही पोचला कोरोना  

किशोर कुदळे

वाल्हे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या अतिदुर्गम भागातील पिंगोरी येथे मुंबईहुन आलेल्या एका महिलेचा कोरोना अहवाल काल (ता. 23) रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली. त्यामुळे पुरंदरमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 31 वर गेली आहे.

तहसीलदार सरनोबत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगोरी येथे ठाणे येथून आलेल्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पिंगोरीसह वाल्हे 
परिसरातील ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. 59 वर्षे वय असलेली ही महिला दहा दिवसांपूर्वी ठाणे येथून आपल्या पतीसह पिंगोरी या आपल्या मुळ गावी आली 
होती. ती पिंगोरी येथील आपल्या घरी दहा दिवस होम क्वारंनटाइन होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप, खोकला येऊ लागला. त्यामुळे त्यांना पुणे येथे 
उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काल रात्री उशिरा त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.


महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सरपंच विद्या यादव, पोलिस पाटील राहुल शिंदे, वाल्हे औट पोस्टचे हनुमंत गार्डी आदींनी तत्काळ घटनास्थळी जाऊन या कुटुंबातील दहा जणांना क्वारंटाइन केले होते. होम क्वारंटाइन दरम्यान महिलेचा घरातील इतर लोकांशी संपर्क आल्याचा संशय आहे. त्यामुळे आज या थेट संपर्कातील लोकांना जेजुरी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये पुढील तपासणीसाठी अलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे.


कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुरंदर प्रशासनाच्या वतीने व आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून, पिंगोरी येथे नव्यानेच कोरोनाचा रूग्ण सापडल्याने येथील आदर्शनगर परिसर सील करण्यात आला आहे. संबंधित कोरोना रुग्णाच्या घरातील व संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक आबनावे यांनी दिली.

कोविड विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून पुरंदर तालुका प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असुन पुढील कार्यवाही सुरू असल्याचे जेजुरीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अजूनही रेड झोन असलेल्या पुणे व मुंबई येथुन गावांकडे सहकुटूंब स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण थांबलेले नाही. त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असून, पुण्याला नियमीत ये-जा करणाऱ्या लोकांना गावातील लोकांमध्ये न मिसळण्याची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा शहरांमधील साथ गावांमध्ये झपाट्याने पसारण्यास वेळ लागणार नसल्याचेही माने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT