corona1 
पुणे

धक्कादायक, आरोग्य कर्मचारीच अडकलेत कोरोनाच्या जाळ्यात

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेल्या विलगीकरण पथकात तैनात नगरपालिकेतील आरोग्य कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील एकूण तीन जणांसह शहरात एकूण १४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून १३१ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २४ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचमधील एका पोलिसासह शालीमार चौक येथे ५, गोवा गल्ली येथे २, पंचशील चित्रपटगृह परिसर येथे १, सरपंच वस्ती येथे १, समतानगर येथे १, संस्कार नगरी येथे १, नवगिरे वस्ती येथे १ व भीमनगर येथे १, अशा एकूण १४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये १० पुरूष व ४ महिलांचा समावेश आहे. बाधितांचे वय २१ ते ५५ दरम्यान असल्याची माहिती उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

आता शुभमंगल सावधान म्हणा वीस लोकांमध्येच
                  
दौंड नगरपालिका हद्दीत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्याच्या भावाला बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्याने या कर्मचाऱ्यास व कुटुंबातील अन्य दोन जणांना बाधा झाली आहे. २२ जुलै रोजी उप जिल्हा रूग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यासही बाधा झालेली आहे.

दौंड शहरातील दोन कोविड केअर सेंटरमध्ये सध्या बाधितांवर उपचार सुरू आहेत. परंतु, बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन दौंड- लिंगाळी रस्त्यावरील एका शिक्षण संस्थेची जागा कोविड केअर सेंटरसाठी निश्चित करून त्या ठिकाणी २०० खाटांची व्यवस्था केली जात आहे.
 

दौंड शहरात ७१ बाधित रूग्ण आहेत. त्यापैकी २३ जणांना घरीच विलग करून उपचार केले जात आहे. बाधित रूग्ण सापडल्यावर त्यांच्या संपर्कातील नागरिकांची स्वॅब टेस्ट घेतली जात आहे व त्यामध्ये अनेकांना बाधा झाल्याचे व या बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केल्यांनतर अन्य बाधित सापडत असल्याने चक्राकार पद्धतीने बाधित वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर नागरिकांनी शारीरिक अंतर राखणे आणि मास्कचा वापर करण्याशिवाय तरणोपाय नाही. 
 - डॅा. संग्राम डांगे,
अधीक्षक, उप जिल्हा रूग्णालय, दौंड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT