corona1 
पुणे

महिलेच्या मृत्यूनंतर केलेल्या तपासणीत कुटुंबातील दहा जणांना कोरोना 

शरद पाबळे

केसनंद (पुणे) : पूर्व हवेलीत बुर्केगावात ज्येष्ठ महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर आरोग्य खात्याने या कुटुंबाच्या केलेल्या तपासणीत एकाच कुटुंबातील  १० जण कोरोनाबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे. तर, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने गाव परिसर १४ दिवस प्रतिबंधित जाहिर करून कडक उपाय योजना सुरु केल्या आहेत.

याबाबत वाडेबोल्हाई आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्केगाव येथे एकत्र कुटूंबातील आजारी ज्येष्ठ महिलेचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या महिलेला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्याचा अंदाज येताच आरोग्य खात्याने योग्य काळजी घेत तत्परतेने या कुटुंबातील १३ सदस्यांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतले.

या तपासणीचा अहवाल आज आला. यावेळी या एकाच कुटुंबातील चार लहान मुलांसह एकूण १० जण कोरोनाबाधीत निघाले. त्यामुळे प्रशासनासह गाव परिसरातील नागरिकांत खळबळ उडाली. कोरोनाबाधितांत दोन महिलांसह चार मुलांचा समावेश आहे. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने संबंधित परिसर सिल केला असून, अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव १४ दिवस प्रतिबंधित जाहिर करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांना पाठवत कडक उपाय योजना सुरु केल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. 

अमोल कोल्हे यांच्या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....
      
या महिलेची दोन मुले नोकरीस असून, त्यांना नेमका कोठून संसर्ग झाला. तसेच, या कुटुंबाच्या संपर्कात कोण कोण आले. याचीही माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. यातील ९ जणांना पुण्यात, तर एक जणास वाघोलीत उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.
   
Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur Highway Accident : टायर फुटून क्रूझर थेट ट्रकवर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू; गाडीचा चुराडा

Latest Marathi News Live Update : मुंबईत एसीबीची मोठी कारवाई! सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

Google चा मोठा खुलासा! Zero Day मुळे धोक्यात आलेत 3.5 अब्ज क्रोम वापरकर्ते; आत्ताच 'हा' एक बदल नाही केला तर डेटा होऊ शकतो गायब

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

SCROLL FOR NEXT