corona 
पुणे

पुरंदरमधील नागरिकांसाठी या 14 जणांचा अहवाल ठरला...

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील 
सासवड शहरातील  कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील सातजण व जवळार्जुन येथील सात व्यक्तींचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, रुग्ण संख्या सातवर व  नवीन संपर्कातील लोक वाढल्याने डोकेदुखी कमी होत नाही. त्यामुळे कोरोनामुक्त पुरंदर होणे अजून दूरवरच चालले आहे. तरीही मांढर येथील रुग्णाच्या मृत्यूने व आणखी एकाच्या मृत्यूने आणि मुंबई व पुणे कनेक्शनमधून धाकधूक सतावतेय.

पुरंदर तालुक्यतील जवळार्जुन येथील थेट संपर्कामधील 8 पैकी 7 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक प्रलंबित आहे. मांढर येथील 22 थेट संपर्कातील  लोकांना सासवड येथे ट्रिपल कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, सुपे, सासवड, जवळार्जुनसह कोडीतचे रुग्ण बरे झाल्याचा अहवाल नाही. जेजुरीपाठोपाठ वीरचा पोलिस रुग्ण बरा झाला. वीरचे सातजण घरी सोडल्यानंतर सुपे येथील रुग्णाच्या संपर्कातील 16 निगेटिव्ह घरी सोडले. कोडीतचे रुग्ण संपर्कातील पाचपैकी चार निगेटिव्ह आलेत.

मांढर येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तालुका खडबडून जागा झाला आहे. तसेच, मांढरधील आणखी एकाचा आकस्मिक मृत्यू चक्रावून टाकणारा आहे. वीर  गावातील कोरोना पाॅझीटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कातील सातजण तपासणीत निगेटिव्ह आले आहेत. त्यांना घरी होम क्वारंटाइन होण्यासाठी कोविड केअर सेंटरमधून सोडण्यात आले. सुपे येथील रुग्णाच्या थेट संपर्कातील 17 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुरंदरकरांना बर्‍यापैकी दिलासा मिळाला आहे. 

दरम्यान, बाहेरगावाहून आलेले तर शाळांमधील क्वारंटाइन व होम  क्वारंटाइन हजारो आहेत. त्यातून प्रत्येक गावात धाकधूक आहे. त्यावर प्रशासनाची नजर आहे. त्यांनी बाहेर न फिरण्याचे सक्त आदेश आहेत. लाॅकडाऊन असला तरी बरीच बंधने शिथिल झाली. सवलतींमुळे नोकरदार पुण्यात जाऊ व येऊ लागले. अशा मंडळींनी कामावरून आल्यावर होम क्वारंटाइन व्हायचे असते, पण थोडा अपवाद वगळता बाकी शेकडो लोक नियम पाळत नाहीत.  त्यांना आवरण्यासाठी दवंडी देऊनही उपयोग होईना. त्यामुळे मुंबई कनेक्शनमधील दोन रुग्ण आणि पुणे कनेक्शनधून चार रुग्ण सापडले. बाहेरुन आलेले शेकडो लोक क्वारंटाइन आहेत. मुंबईकर तर इतके आलेत आणि रोज शेकडो येतच आहेत. त्याच्यातून आजही धाकधूक गावागावात आहे. काळजी वाढली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT