Corona Test 
पुणे

भोरमधील आणखी दोघांचे कोरोना अहवाल... 

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर तालुक्‍यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास पुन्हा सुरुवात झाली असून, रविवारी (ता. 24) तीन रुग्णांशिवाय सोमवारी (ता. 25) दुपारी आणखी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बाजारवाडी ग्रामपंचायतीमधील मानकरवाडीतील तरुणाचा आणि रायरी ग्रामपंचायतीमधील रेणुसेवाडीतील एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यातील रुग्णांची संख्या सहा झाली आहे. 

मानकरवाडी येथील तरुण हा काही दिवसांपूर्वी मुंबईहून गावी आला होता. तेव्हापासून तो होम क्वारंटाइन होता. तर रेणुसेवाडी येथील तरुण हा रायरी येथील कोरोनाग्रस्त कुटुंबाच्या सोबत मुंबईहून आला होता. रायरी येथील दोन मुलींसह पती- पत्नी कोरोनाबाधित झाले आहेत. तपासणीसाठी पाठविलेले बसरापूर येथील एक आणि रायरीतील आणखी तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी नेरे येथील दोन आणि नसरापूर येथील दोन जण कोरोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

भोर तालुक्‍यात दोन दिवसात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली. तहसीलदार अजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कऱ्हाळे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी मानकरवाडीस भेट देवून कोरोनाच्या उपाययोजनांची पाहणी केली. दोन्ही गावांमधील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांना संस्था क्वारंटाइन करण्यासाठी आणि आवश्‍यक त्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.

काळजी घेण्याचे आवाहन 
भोर तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण वाढत असल्यामुळे प्रशासनाबरोबर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले. बाहेरून आलेल्यांच्या संपर्कात कोणीही न राहता त्यांना संस्था क्वारंटाइन विभागात पाठवावे. गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, आशा व अंगणवाडी कर्मचारी आणि शिक्षक आदींसमवेत गावातील पोलिस पाटील, सरपंच व ग्रामपंचायती सदस्यांसह ग्रामसुरक्षा दलातील कार्यकर्त्यांनी सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असेही राजेंद्रकुमार जाधव यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT