Corona research will get boosters due to ICMR seeks proposal.jpg 
पुणे

कोरोनाच्या संशोधनाला मिळणार बूस्टर : ICMRने मागितले प्रस्ताव; 1 मे पर्यंतची मुदत

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशातल्या कोविड-19 संदर्भातील वैद्यकीय संशोधनाला आता बूस्टर डोस मिळणार आहे. रोगप्रतिकारशक्ती आणि पेशीस्तरावरील संशोधनाचे प्रस्ताव भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने मागविण्यात आले आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक संशोधनासाठी आयसीएमआरच्यावतीने आर्थिक निधी पुरविण्यात येणार आहे. 


जगभरामध्ये कोविड-19 संबंधीत 78 प्रकारचे औषधे आणि 600 प्रकारच्या उपचार पद्धतींवर संशोधन चालू आहे. देशातही मोठ्या लोकसंख्येसाठी उपचारात्मक संशोधन व्हावे यासाठी "आयसीएमआर'च्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. "कोविड-19' बाधितांच्या निदानापासून त्यांच्या उपचारापर्यंतचे अनेक वैज्ञानिक प्रश्‍न अजूनही निरुत्तरित आहे. अधिक शास्त्रीय, जलद आणि मोठ्या लोकसंख्येच्या उपयोगात येईल अशा उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय संशोधनाचे प्रस्ताव आयसीएमआरकडे 1 मे पर्यंत सादर करता येणार आहे. सर्व विद्यापीठातील संशोधक, सरकारी आणि खासगी प्रयोगशाळा, संस्था व संशोधक यासाठी प्रस्ताव पाठवू शकतात. 

1) पेशी स्तरावरील उपचार पद्धती ः 
कोविड-19 चा संसर्ग रोखण्यापासून ते संसर्गित व्यक्ती लवकर बरी व्हावी यासाठी पेशी स्तरावर चाललेले संशोधन. तसेच विविध गटातील रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती, त्यांमध्ये होणारी वाढ आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधीच्या संशोधनाचे प्रस्ताव. 

2) जैविक किंवा मॉल्यूक्‍युलर स्तरावरील संशोधन ः 
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचे किंवा एन्झाईमची निर्मिती होते. कोविड-19च्या उपचारासंबंधीच्या जैवरसायनांचे संशोधन. तसेच या अँटीबॉडीज आणि अँटीजन्सची कार्यप्रणाली विशद करणे. कोविड-19 साठी प्रतिजैविके तयार करणारे आणि दिशा देणारे संशोधन. 

3) लोकसंख्यात्मक अभ्यास 
नॉव्हेल कोरोना विषाणूंमुळे मोठ्या लोकसंख्येतील रोगग्रस्त आणि रुग्णांच्या प्रमाणासंबंधीचे संख्याशास्त्रिय संशोधन. त्याच्या प्रसारासंबंधीचे विश्‍लेषण आणि दिशा. रुग्ण दगावण्याचे कारणे, इनहर्ट जेनेटिक बदल, अतिदक्षतेसंदर्भात घ्यावयाची काळजी, आदी संदर्भातील संशोधन 

4) निदानासंबंधीचे संशोधन 
कोविड-19चे निदान करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणावर विविध निदान पद्धती उपलब्ध आहे. कोविडच्या "आरएनए'पासून "डीएनए' तयार करणे आणि अँटीबॉडिजच्या आधारावर निदान करणे, अशा दोन पद्धतींवर सध्या काम चालू आहे. परंतु, बाजारात उपलब्ध किटच्या योग्य क्षमतेबद्दल अजूनही खात्री नाही. निदानासंबंधी शंभर टक्के खात्रीलायक, संवेदनशील, अचूक आणि सहज असलेल्या संशोधनाचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रस्तावासंबंधी ही घ्या काळजी 
- प्रस्तावात पूर्णतः वैज्ञानिक पारदर्शकता असावी 
- नमुना मिळविण्यापासून त्याचे वहन, प्रक्रियासंबंधी निर्देशाचे योग्य पालन 
- उपचार, प्रतिबंधात्मक उपाय प्रत्यक्ष माणसाच्या उपयोगातील असावे 
- प्राण्यांवरील चाचणीची आवश्‍यकता नसल्यास त्यासंबंधी वैज्ञानिक स्पष्टीकरण 
- मानवी चाचणीसंबंधीच्या प्रस्तावामध्ये साइड इफेक्‍ट आणि इतर वैद्यकीय स्पष्टीकरणाची पूर्तता असावी 
- दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारे संशोधन प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत 
- आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणारे इंग्रजीतील प्रस्ताव स्वीकारले जातील 

Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...

महत्त्वाच्या तारखा 
- प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख ः 1 मे 
- निवड झालेल्या प्रस्तावांची घोषणा ः 10 मे 
- मे 2022 पर्यंत संशोधन पुर्ण होणे अपेक्षित 
- प्रस्ताव इथे पाठवा ः tximmun.icmr@gmail.com 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT