Corona Rule Sakal
पुणे

दिव्याखाली अंधार: दौंड पोलिस ठाण्याबाहेरच निर्बंधांची ऐशीतैशी

जमावबंदी व रात्री संचारबंदीचा आदेश असताना पोलिस ठाण्यासमोरच त्याला आव्हान देण्यात आले आहे.

प्रफुल्ल भंडारी

दौंड : जमावबंदीचा आदेश असताना दौंड पोलिस ठाण्यासमोरच सर्व निर्बंध झुगारून नगर जिल्ह्यातील एका नूतन संचालकांचा सत्काराचा कार्यक्रम जल्लोषात करण्यात आला. दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचा आदेश असताना पोलिस ठाण्यासमोरच त्याला आव्हान देण्यात आले आहे. (Corona Rule Not Follow In Daund)

श्रीगोंदा (जि. नगर) येथील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडू जगताप संचालकपदी निवडून आले. त्या निमित्त दौंड पोलिस ठाण्यासमोर त्यांच्या मित्रपरिवाराने १७ जानेवारी रोजी सायंकाळी सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. ढोल - ताशांचा निनाद व फटाक्यांची आतषबाजी करून सत्कार झाला.

सत्कार करणारे आणि घेणार्यांनी मात्र तोंडावर मास्कचा वापर टाळण्याबरोबर गर्दी केली होती. दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना या बाबत विचारले असता त्यांनी माहिती घेऊन कारवाई करू, अशी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT