covid 19 test swab 
पुणे

Corona Update - पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यातील आकडेवारी दिलासादायक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग आता मंदावला असून राज्यातील आकडेवारी दिलासादायक अशी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 16 लाख 87 हजार 784 रुग्ण सापडले असून 44 हजार 703 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 15 लाख 24 हजार 304 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये आढळल्याचं दिसून येत आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये राज्याच्या तुलनेत मृत्यूदर जास्त आहे. या चार जिल्ह्यात सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे. आरोग्य विभागाचे संचालक सतिश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यात कोरोनाचा Peak येऊन गेला आहे. सप्टेंबर महिन्यात या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्ण होते. मात्र दिलासा देणारी एक बाब म्हणजे पुणे, मुंबईसारखा कोरोनाचा उद्रेक याठिकाणी झाल्याचं बघायला मिळालं नाही. याला अनेक कारणं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे-मुंबईतील लोकसंख्येची घनता. सुरवातीला या दोन शहरांमध्ये कोरोना पसरला. याठिकाणचे लोक गावी जायला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील इतर भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. 

सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांपैकी कोल्हापूरचा रिकव्हरी रेट सर्वाधिक 94.04 टक्के इतका आहे. त्याखालोखाल सांगली (90.61), सोलापूर (98.28)  आणि सातारा (87.65) यांचा क्रमांक लागतो. रिकव्हरी रेट दिलासादायक असला तरी कोल्हापूरचा मृत्यूदरही जास्त आहे. याशिवाय एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत साताऱ्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो.  

रविवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोल्हापूरमध्ये एकूण 47 हजार रुग्ण आढळले. त्यापैकी सध्या सक्रीय रुग्ण 1207 इतके आहेत. 9 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक 10 हजार सक्रीय रुग्ण होते. तर साताऱ्यात आतापर्यंत 47 हजार 753 रुग्ण सापडले  असून सध्या 4484 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 17 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण होते. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 46 हजार 965 कोरोनाबाधित सापडले असून जिल्ह्यात 19 सप्टेंबरला सर्वाधिक 10 हजार सक्रीय रुग्ण होते. 

गेल्या तीन ते चार आठवड्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमधील परिस्थिती सुधारत आहे. साताऱ्यात गेल्या दहा दिवसांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. तर सोलापूरमध्येही रुग्णवाढीचा दर कमी आहे. कोल्हापूर आणि सांगलीतही अशीच परिस्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''तो' व्यवहार रद्द! माझ्या जवळचा कुणीही असला तरी..'' अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिली तंबी

Motivational Story: वडील रिक्षा चालक तर आई गृहिणी, घरची परिस्थिती बेताची... कष्टातून लेक उभी राहिली अन् सीए परिक्षेत मोठी बाजी मारली

Latest Marathi News Live Update: सुरेश धस मनोज जरांगेंच्या भेटीला

कुणीही नसताना फ्लश झालं, खांद्यावर हात ठेवला... दिग्दर्शकाने सांगितला मुकेश मिलमध्ये 'उलाढाल'च्या शूटिंगचा अनुभव

voters duplicate names: चिपळूणमधील मतदार यादीतून ४०० दुबार नावे हटवली; निवडणूक तयारीसाठी अंतिम यादी अद्ययावत

SCROLL FOR NEXT