daund  
पुणे

दौंड शहरामधील रेशनिंग दुकानदाराला कोरोना...

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, आज एका रेशनिंग दुकानदारासह तब्बल आठ जणांना बाधा झाली आहे. बाधितांमध्ये २५ वर्षाच्या तरुणापासून ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे.

दौंड उप जिल्हा रुग्णालयाकडून ४२ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ जुलै रोजी रात्री आलेल्या अहवालानुसार आठ जणांना बाधा झाली आहे. बाधितांमध्ये एक महिला व सात पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

दौंड शहर व परिसरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी चौक, इरिगेशन कॅालनी, पंचशील थिएटर परिसर, श्री काळभैरवनाथ मंदिर परिसर, श्री विठ्ठल मंदिर परिसर, शालीमार चौक व वडार गल्ली येथील एकूण आठ जणांना आज कोरोनोची बाधा झाली आहे. शहरात १ ते १४ जुलै या कालावधीत तब्बल ४६ जणांना बाधा झाली आहे. 

प्रतिबंधित क्षेत्राचा फज्जा
दौंड शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहर ५ जुलैपासून पुढील चौदा दिवसांकरिता प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. परंतु, अत्यावश्यक सेवांसह सर्व प्रकारचे व्यवसाय लपून- छपून सुरू आहे. सर्व प्रकारची वाहतूक सुरू असून, कोणतेही निर्बंध नसल्याने प्रतिबंधित क्षेत्रासंबंधी आदेशाची अंमलबजावणी तर दूर त्याची राजरोस थट्टा सुरू आहे. 

अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार
प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त दुकाने सुरू ठेवणे, मास्कचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न राखणे, सॅनिटायजर चा अभाव, विना मास्क पायी व दुचाकी वाहनांवर फिरणे, आदी प्रकरणी दौंड नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांसह दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. परंतु, कारवाई दरम्यान काही दुकानदार व दुचाकीस्वार अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांच्याशी हुज्जत घालत आहेत. 
     
Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT