corona 
पुणे

सासरवाडीला गेला...येताना गावासाठी कोरोना घेऊन आला...

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) :  जुन्नर तालुक्यातील कोरोनामुक्त असलेल्या नारायणगाव  शहरात तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालावरून आज स्पष्ट झाले. मागील पाच महिने कोरोनामुक्त असलेल्या व सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या  नारायणगाव शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासन व ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे.

नारायणगाव येथे कोरोनाचा शिरकाव टाळण्यासाठी सरपंच योगेश पाटे, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी कठोर उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे मागील चार महिने नारायणगाव शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी वारुळवाडी येथे एक रुग्ण आढळून आल्याने वारुळवाडी कंटेंमेंट झोनमध्ये, तर नारायणगाव बफर झोनमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, आज नारायणगाव कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे आरोग्य विभागाने या तरुणाच्या  संपर्कात आलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. 

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी माहिती दिली की, या तरुणाची सासुरवाडी कसबा पेठ (पुणे) आहे. काही दिवसांपूर्वी ते कसबा पेठ येथे गेले होते. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने नारायणगाव येथील एका डॉक्टरकडे उपचार केले होते. तरुण व त्याची पत्नी या दोघांचीही कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी तरुणाचा अहवाल आज प्राप्त झाला. अद्याप त्याच्या पत्नीचा अहवाल आला नाही.

सहायक पोलिस निरीक्षक घोडे पाटील म्हणाले की, मागील दोन दिवसांत मास्क न वापरणाऱ्या ६५ जणांवर कारवाई करून ३२ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सरपंच पाटे म्हणाले की, ग्रामस्थ व व्यापारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे मागील चार महिने कोरोनाला अटकाव घालण्यात यश आले. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यामुळे मागील आठ दिवसांत तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. शक्यतो प्रवास टाळावा. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये. बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीची माहिती ग्रामपंचायतीला द्यावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT