coronavirus 164 patients within one day 104 serious 
पुणे

Coronavirus : पुण्यातली कोरोनाची परिस्थिती जेवढी चिंताजनक तेवढीच दिलासादायक

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : पुण्यातली कोरोनाची परिस्थिती जेवढी चिंताजनक तेवढीच दिलासादायक आहे. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्याने नवा उच्चांक गाठला असून, आतापर्यंतचे सर्वाधिक 164 रुग्ण एका दिवसांत सापडले आहेत. गेल्या पाच दिवसांत रोजच रुग्ण संख्येत मोठी भर पडत असल्याने पुणेकरांत पुन्हा भीती पसरत आहे. मात्र, कोरोनामुक्तांची संख्या पुणेकरांना दिलासा देणारी असून, याच दिवसभरात 120 जण घरी गेले आहेत. दरम्यान, विविध रुग्णालयांतील 107 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे; तर सात जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेने नागरिकांच्या तपासणीचा वेग वाढविला असून, सध्या रोज एक हजाराहून अधिक जणांची तपासणी होत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र गेल्या आठवड्यात नव्या रुग्णांचे प्रमाण घटले आणि बरे होणाऱ्यांची संख्या वाढल्याने पुणेकरांमधील भीती कमी झाली. परंतु, आता पुन्हा नव्या रुग्णांचा आकडा सव्वाशेच्या पुढे जात आहे. याआधी सर्वाधिक 135 रुग्ण सापडले होते. त्यात वाढ होऊन पहिल्यांदाच दीडशेपेक्षा अधिक म्हणजे, 164 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या 2 हजार 737 झाली असून, त्यातील 1 हजार 209 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 156 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या विविध रुग्णालयांत 1 हजार 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ससूनसह विविध रुग्णालयांतील सात जणांचा मृत्यू झाला असून, या सर्वांना इतरही आजार असल्याची नोंद आहे. पुणे शहरात आतापर्यंत 24 हजार 748 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 21 हजार जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT