Corona vaccination esakal
पुणे

मुदत उलटली; घाबरू नका, लस घ्या!

पहिला डोस झाल्यानंतर ठराविक मुदतीमध्ये दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक नागरिकांना दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्याने मुदत संपलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पहिला डोस झाल्यानंतर ठराविक मुदतीमध्ये दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक नागरिकांना दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्याने मुदत संपलेली आहे.

पुणे - पहिला डोस झाल्यानंतर ठराविक मुदतीमध्ये दुसरा डोस (Dose) घेणे आवश्‍यक (Important) आहे. मात्र, अनेक नागरिकांना दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्याने मुदत संपलेली आहे. अशा नागरिकांनी गोंधळून किंवा घाबरून न जाता महापालिकेच्या लसीकरण (Vaccination) केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आरोग्य विभागाने (Health Department) स्पष्ट केले आहे.

महापालिकेतर्फे कोरोनाचा प्रतिबंधक कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशील्ड या दोन लस नागरिकांना दिल्या जात आहेत. कोव्हॉक्सीनचा पहिला डोस झाल्यानंतर २८व्या दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो. तर कोव्हीशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर १२ ते १६ आठवड्याच्यामध्ये दुसरा डोस घेता येतो. केंद्र सरकारकडे कोव्हीशील्ड लस मुभलक उपलब्ध असल्याने याचेच जास्त लसीकरण शहरात झालेले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सुरू जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोंबर या महिन्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण झाले. या नागरिकांनी कोव्हीशील्डची ८४ ते ११२ दिवसाच्या दरम्यान लस घेणे आवश्‍यक होते. बहुतांश नागरिकांनी वेळेवर दुसरा डोस घेतला असला तरी अद्याप सुमारे ३ लाख लोकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. आता ओमिक्रॉम विषाणूंमुळे रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे लस न घेतलेल्या नागरिकांची पुन्हा लसीकरण केंद्राकडे पावले वळत आहेत, पण अनेकांना आपल्याला लस मिळणार का ? याबाबत गोंधळ आहे.

महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘पहिला डोस घेतल्यानंतर नागरिकांनी दुसरा डोस वेळेत घेणे आवश्‍यक होते. मात्र, ज्या नागरिकांना पहिल्या डोसनंतर कोरोना झाला, किंवा अन्य कारणामुळे दुसरा डोस घेतला नाही. अशा नागरिकांना आता दुसरा डोस घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही. त्यांची कोवीन ॲपवर नोंदणी झालेली असल्याने व पहिल्या डोसची नोंदही असल्याने दुसरा डोसही मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT