corona 
पुणे

जुन्नरमधील कोरोनाबाधित महिलेच्या मुलाचा रिपोर्ट आलाय असा...

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील  कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेच्या मुलाचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मांजरवाडी येथील कोरोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे. दोन्ही रुग्णांना उपचारासाठी लेण्याद्री येथील कोवीड उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

तसेच, मुंबई येथून आलेल्या वारूळवाडी येथील सहा जणांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.  

मांजरवाडीतील कोरोनाबाधित महिला मुलासह मुंबई येथून माहेरी मांजरवाडी येथे आली होती. ताप आल्याने या महिलेची कोरोना तपासणी केली होती. त्याचा २५ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यामुळे तिच्या मुलाची कोरोना तपासणी करण्यात आली होती. मुलाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मांजरवाडी येथील  कोरोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे.

नारायणगाव,वारूळवाडी व परिसरातील बारा गावात मागील दहा दिवसांत पुणे व मुंबई भागांतून आलेल्या दोन हजार व्यक्तींना होम कोरंटाइन, तर दोनशे पंचवीस जणांना संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजाळ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT