coronavirus lockdown 5 guidelines for pune city
coronavirus lockdown 5 guidelines for pune city 
पुणे

महत्त्वाची बातमी : पुणेकरांनो वाचा लॉकडाउन5च्या गाईडलाईन्स

सकाळ डिजिटल टीम

पुणे : देशातील पाचवा लॉकडाउन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला. मात्र, त्यात मंदिरे, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स 8 जूनपासून खुली करण्यात येणार आहे. तसेच देशार्तंगत आणि जिल्हातंर्गत वाहतूकही खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र शाळा, महाविद्यालये 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. आता राज्य सरकारच्या सुधारित आदेशाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पुण्याच्या दृष्टीने लॉकडाउन5ची घोषणा चिंतेत टाकणार असली तरी, शहरातील कंटेन्मेंट झोनच्याबाहेर बऱ्याच गोष्टी सुरू होणार आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउन असला तरी, जनजीवन सुरळीत करण्यासाठीच्या या मार्गदर्शक सूचना आहेत, असे, केंद्राने आदेशात म्हटले आहे. तसेच शैक्षणिक संस्थांबाबत राज्य सरकार संबंधित घटकांशी चर्चा करून त्या कधी सुरू करायच्या, याचा निर्णय जुलैमध्ये घेईल, असेही आदेशात म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य विभाग या बाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे. तसेच राज्य सरकारने या बाबत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्राने सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या बाबत सुधारित आदेश कधी काढणार, त्यात काही बदल होणार का, याकडे लक्ष लागले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध केंद्र सरकारने कायम ठेवले आहेत.

पुण्यात काय सुरू, काय बंद?

  • मेट्रो, व्यायामशाळा, सिनेमागृह, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे तसेच सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम कधी हे सध्या तूर्त बंदच राहणार आहे. त्याबाबत परिस्थितीनुसार आढावा घेऊन या बाबतचा निर्णय नंतर जाहीर करण्यात येईल.
  • रात्री नऊ ते पहाटे पाच दरम्यान संचारबंदी कायम राहणार आहे. अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळून, ही संचारबंदी असेल.
  • प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन कायम राहणार आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्र, हे स्थानिक प्रशासन निश्चित करेल. त्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.
  • आंतरराज्य आणि राज्यातंर्गत वाहतूक खुली करण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगीची गरज नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन  राज्य सरकार ही वाहतूक नियंत्रित करू शकते. विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक या पूर्वीच्या निर्णयानुसार सुरू राहणार आहे. माल वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतील, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.
  • 65 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षांखालील मुलांनी घरातच थांबावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT