coronavirus pune city number may increase dr. deepak mcoronavirus pune city number may increase dr. deepak mhaisekar press conferencehaisekar press conference 
पुणे

पुण्याला सावधानतेचा इशारा : कोरोना रुग्णांची संख्या वाढणार 

सकाळ डिजिटल टीम

पुणे : संशयित कोरोना रुग्णांच्या नमुने तपासण्याची प्रक्रिया वाढविण्यात आल्यामुळे येत्या काही दिवसांत बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. मजुरांच्या परराज्यात स्थलांतरासाठी तीनच राज्यांनी परवानगी दिलेली आहे. मजुरांच्या स्थलांतरासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी प्रशासनाकडूनच वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात 2 हजार 885 बाधित रुग्ण असून, 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 2 हजार 537 बाधित रुग्ण असून, 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे प्रमाण सुमारे साडेपाच टक्के इतके आहे. 762 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 86 रुग्ण गंभीर आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांनी मजुरांच्या स्थलांतरासाठी परवानगी दिली आहे. अन्य राज्याकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच, युरोपसह अन्य देशांमधून काही भारतीय व्यक्ती मायदेशी परत येत आहेत. त्यापैकी 80 व्यक्ती पुण्यात येणार असून, त्यांना 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त के. वेंकटेशम म्हणाले, परराज्यातील व्यक्तींना स्थलांतरित करण्याबाबत पोलिस उपायुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने राजस्थान, तेलंगणा, बिहारसह आणि काही राज्यांमध्ये बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढील दहा दिवस खूप महत्त्वाचे असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, पुढील दहा ते पंधरा दिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होणार आहे. मृत्यूच्या प्रमाणात घट आणणे आणि बाधित रुग्णांची संख्या कमी करणे ही प्रशासनासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. 
मजुरांच्या स्थलांतरासाठी लवकरच आणखी तीन विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी प्रशासनाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी कोणत्याही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. पुणे शहरात 68 हजार मजुरांनी तसेच पिंपरी-चिंचवड येथून सुमारे 35 हजार मजुरांनी नाव नोंदणी केली आहे. लातूर, नांदेड, यवतमाळ, धुळे यासह विविध जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाही बसेसच्या मदतीने मूळ गावी पाठविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण लक्ष देण्यात येईल. 

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संक्रमणशील भागात (कंटेनमेंट झोन) सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने सुरू राहतील. तसेच अन्य ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने सुरू राहतील, असे स्पष्ट केले. संशयितांचे नमुने तपासण्यासाठी हॉटस्पॉट असलेल्या भागातच सुविधा सुरू करण्यात येत आहे. दररोज एक हजार नागरिकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचा दर दहा दिवसांवरुन 11 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरांमध्ये 15 दिवस पुरेल इतके अन्नधान्याचे किट देण्यात येत आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

काय घडले?

  • पुण्यात रुग्ण वाढण्याचा प्रशासनाचा इशारा 
  • मजुरांच्या स्थलांतरासाठी तीन राज्यांचीच परवानगी 
  • स्थलांतरासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही
  • युरोपसह परदेशातून 80 नागरिक पुण्यात येणार
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

Successful Delivery: 'साताऱ्यातील शासकीय रग्णालयात एका वेळी चार बाळांना जन्म'; आईसह तीन मुली, मुलगा सुखरूप, प्रसूतीची तिसरी वेळ

SCROLL FOR NEXT