Corona-Patient 
पुणे

पुणे शहरातल्या पाच भागांत आहेत अत्यल्प कोरोना रुग्ण; पेठांमध्ये चिंताजनक परिस्थिती

सकाळवृत्तसेवा

कोथरूड, बावधन, औंध, बाणेर, वारजे भागात कोरोनाचे अत्यल्प रुग्ण तर भवानी पेठे, ढोले पाटील, घोले रस्त्यावर सर्वाधिक रुग्ण
पुणे - कोरोनाचे शहरातील सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अखत्यारित म्हणजे 325 तर, सर्वात कमी 3 रुग्ण कोथरूड- बावधन परिसरात आहे. पुण्यातील 90 टक्के रुग्ण महापालिकेच्या 15 पैकी भवानी पेठ, ढोल पाटील रोड, घोले रोड, येरवडा आणि कसबा पाच क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारित आहेत.

दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाने थैमान घातले आहे, हे महापालिकेच्या आकडेवाडवारीच्या विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच महापालिकेने या भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. पाच क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारित सुमारे 71 हजार कुटुंबे राहतात. त्यांची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख आहे. या कुटुंबांपैकी किमान 20 हजार कुटुंबांनी स्थलांतर करावे, असा महापालिकेचा प्रयत्न आहे. परंतु, त्यास अद्याप यश आलेले नाही. त्यातच गेले दोन दोन दिवस पाऊस पडत असल्यामुळे स्थलांतर सध्या शक्य होणार नाही, असा अंदाज महापालिकेतील अधिकाऱयांनी वर्तविला. या 71 हजार कुटुंबांपर्यंत शिधा पोचविण्याची महापालिकेने तयारी केली आहे. त्यांना किमान पंधरा दिवस पुरेल, एवढा शिधा देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

भवानी पेठ, ढोल पाटील रोड, घोले रोड, येरवडा आणि कसबा पाच क्षेत्रिय कार्यालयांच्या अखत्यारितील सर्वच परिसर हॉट स्पॉटमध्ये सध्या नाही. त्यातील काहीच भागाचा समावेश हॉटस्पॉटमध्ये आहे. परंतु, त्या भागातून अन्यत्र कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी महापालिका विशेष खबरदारी घेत आहे. त्यामुळेच त्या भागातील एंट्री- एक्झिट पॉइंट सील करण्यात आले आहेत.

या पाच भागांत दाट लोकवस्ती आहे. कोरोनाने दाट लोकवस्तीत सध्या मुक्काम केला आहे. त्यामुळे शहरात सापडलेल्या 1611 रुग्णांपैकी सुमारे 90 टक्के रुग्ण याच भागातील आहेत. तसेच शहरात आत्तापर्यंत कोरोनामुळे 93 मृत्यू झाले आहेत. त्यातील 70 टक्के मृत्यू याच भागातून आहेत. तुलनेने शहराच्या चारही दिशांची उपनगरे सेफ आहेत. तेथे कोरोनाचे संशयित, रुग्ण आणि मृत्यूचीही संख्या कमी आहे. त्यामुळे महापालिकेने ग्रीन झोन भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला तर, शहराच्या उपनगरांना दिलासा मिळणार आहे. मध्यभागातील निर्बंध मात्र कायम राहतील, अशीच सध्याची चिन्हे आहेत.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्या क्षेत्रिय कार्यालयात किती रुग्ण आहेत
1- भवानी पेठ - 325
2- ढोले पाटील रोड - 246
3- घोले रस्ता - 227
4- येरवडा - 172
5- कसबा - विश्रामबाग - 151
6- धनकवडी - सहकारनगर - 121
7- वानवडी - रामटेकडी - 90
8- बिबवेवाडी - 55
9- हडपसर- मुंढवा - 54
10- नगर रोड - 42
11- कोंढवा - 28
12- सिंहगड रोड - 11
13- वारजे- कर्वेनगर - 9
14- औंध- बाणेर - 4
15- कोथरूड - बावधन - 3

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT