coronavirus pune city third lock down situation better than previous 
पुणे

पुणेकरांच्या प्रश्नांना मिळाली उत्तरे; असा आहे तिसरा लॉकडाउन

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शहरात दुकाने नेमकी कधी आणि केव्हा उघडली जाणार, पेट्रोल पंपांची वेळ किती, पेट्रोल सगळ्यांना मिळणार का आदी पुणेकरांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आता स्पष्ट झाली आहेत. त्यामुळे लॉकडाउन 3 तुलनेने सुसह्य होऊ लागला आहे. अनेकांना हव्या त्या वस्तू मिळू लागल्या आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी करावा लागणारा संघर्षही कमी झाला आहे. 

शहरातील 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. 3 मे पासून तिसऱ्या लॉकडाउनला प्रारंभ झाला आहे. हा लॉकडाउन जाहीर करताना केंद्र आणि राज्य सरकारने अनेक प्रकारची शिथिलता दिली आहे. त्यानुसार महापालिकांनीही स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांच्या दैनंदिन गरजांची दखल घेतली आहे. पुण्यात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांचे एकापाठोपाठ आदेश निघत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यातून गोंधळची परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र, हा गोंधळ पूर्णपणे दूर झाला आहे. नेमके काय आणि कसे उघडे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नागरिक या नव्या बदलांना सरावले आहेत. त्यामुळे लॉक झालेले जीवनमान काहीसे सुरळीत झाले आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये पुढील काळातही कडक उपायोजना करण्याचे सूतोवाच महापालिकेने केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात कोठे काय सुरू?

  • भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता, घोले रस्ता, येरवडा-कळस,धानोरी, कसबा पेठ- शनिवार पेठ या महापालिकेच्या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या अंर्तगत असलेला काही परिसर अतिप्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून महापालिकेने जाहीर केला आहे. तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. त्या भागात मद्यविक्रीची किंवा अन्य कोणत्याही प्रकारची दुकाने उघडी नसतील.
  • कंटेनमेंट झोन वगळता शहराच्या इतर भागात जीवनावश्यक वस्तूंसह अन्य प्रकारची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान खुली राहणार आहेत. कोणत्या वारी कोणती दुकाने खुली करायची, या बाबची यादी महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार सध्या अंमलबजावणी सुरू आहे.
  • पेट्रोल पंपावर पेट्रोल सगळ्यांना मिळणार आहे. त्यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान पंप सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये पंप बंद राहतील.
  • मद्यविक्रीची दुकाने कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान खुली राहतील.
  • शहराच्या परिसरातील तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील उद्योग टप्याटप्याने सुरू झाले आहेत.
  • खासगी ऑफिसेसमध्ये 33 टक्के कर्मचाऱयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात त्यांचीही कामे सुरू झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT