Coronavirus 
पुणे

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमधील ४१ पैकी ३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; आयसोलेशन सेंटरमध्ये पुढील उपचार!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘कोरोना’चा संशय असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 41 संशयितांच्या द्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)कडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, शहरात शुक्रवारी (ता.१३) तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. आता संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी वायसीएम रुग्णालयात दहा खांटाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, भोसरीतील नवीन रुग्णालयात 60 खाटांचे विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिकेच्या मासुळकर कॉलनीतील रुग्णालयामध्ये ‘क्वॉरंटाईन’ कक्ष तयार करण्यात येणार आहे.

संशयित म्हणून अनेकजण महापालिका रुग्णालयात दाखल होत आहेत. शहरातील 41 संशयित रुग्णांच्या द्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)कडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, वायसीएममध्ये असलेल्या कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना भोसरीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. 

भोसरीतील कक्षात दहा जणांना दाखल करण्यात आले आहे. तपासणीसाठी स्वत:हून आलेल्या तसेच महापालिकेच्या पथकांने केलेल्या पाहणीनुसार रेफर करण्यात आलेल्या रुग्णांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर गरज असेल, तरच आयसोलेशन कक्षात दाखल केले जात आहे. तशा प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची गरज नसेल तर होम क्वारंटाईनचा सल्ला दिला जात आहे.

भोसरी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर सुसज्ज अतिदक्षता कक्ष करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णाला शहर सोडून बाहेर उपचार घेण्याची गरज लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT