Corporator son arrested for setting fire to waste processing project 
पुणे

कचरा प्रक्रिया प्रकल्प पेटवल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलाला अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे : आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रकल्प पेटवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे (वय 55, रा.आंबेगाव) व त्यांचा मुलगा कुणाल बेलदरे (वय 35) यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी अटक करुन शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

आमदार होण्याचा प्रयत्न करु नको, नाहीतर...; मनसेच्या रुपाली पाटील यांना जीवे...

आंबेगाव बुद्रुक येथील कचरा प्रकल्प पेटविल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी 15 ते 20 अज्ञात व्यक्तींविरोधात महापालिकेचे ठेकेदार मिलींद पवार (रा. हडपसर) यांनी तक्रार दाखल केली होती. प्रकल्पाला लागलेली आग सलग काही दिवस धुमसतच होती.

महापालिकेने उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प हटविण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हिसंक झालेल्या स्थानिक नागरिकांच्या जमावाने तेथील कार्यालय आणी प्रकल्प पेटवून दिला होता. पवार यांनी दिलेल्या तक्रारीनूसार अज्ञात व्यक्तींनी गैरकायद्याची मंडळी जमवून महापालिकेच्या कचरा प्रकल्पावर हल्ला केला. यामध्ये पवार यांचा जेसीबी आणी पोकलॅंड मशिनची तोडफोड केली. महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे, अशी फिर्याद आहे
.
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहित धरून पुण्यात महापालिकेने तयारी करावी

दरम्यान शंकरराव बेलदरे यांना अटक केल्याचे वृत्त कळताच त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात जमले होते. त्यांनी बेलदरे यांची अटक बेकायदा असल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी अटक कायद्यानूसारच केली असल्याचे त्यांना सांगितले. याप्रकरणी इतरही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एका खोलीत ५ मृतदेह, सर्वांच्या डोक्यात झाडलेली गोळी; अख्खं कुटुंब संपलं, नेमकं काय घडलं?

Gadchiroli News: गडचिरोलीतील धक्कादायक घटना! दीड तास रुग्णालयात विव्हळत होती जखमी महिला; अखेर झाला मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे माजी आमदार मुलासह भाजपच्या वाटेवर

Republic Day Sale : 82 हजारचा iPhone 17 फक्त 47 हजारात? 'या' शोरूममध्ये सुरुय धमाका ऑफर; 26 जानेवारीपर्यंत सुरू राहणार डिस्काउंट डील

Sambhajinagar Book Festival : शेतकरी आजोबा रमले महोत्सवात; दीडशे किलोमीटरवरून आले, स्वतःसोबत नातवासाठीही घेतली पुस्तके

SCROLL FOR NEXT