Corona-Test 
पुणे

पुणेकरांनो, कोरोना टेस्टबाबत महापालिकेने घेतलाय महत्त्वाचा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे घाबरण्याचे अथवा चिंता करण्याचे कारण नाही. दररोज अधिकाधिक कोरोनाच्या चाचण्या व्हाव्यात, यासाठी दर दिवसाला 500 चाचण्यांचा खर्च करण्याची तयारी पुणे महापालिकेने दर्शविली आहे. यासाठी खासगी लॅब बरोबर बोलणी सुरू असून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

गायकवाड यांनी सोमवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य शासनाने कोरोनाच्या चाचण्यांसाठी खासगी लॅबला प्रति चाचणी 2 हजार 200 रुपये इतका दर निश्‍चित केला आहे. सध्यस्थितीत 500 ते 600 चाचण्यांचा अहवाल येण्यास जास्त उशीर होत आहे. त्यामुळे त्यांचे अहवाल येणे मागे राहते.

या पार्श्‍वभूमीवर कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी आणि लवकर अहवाल मिळण्यासाठी महापालिकेने चाचण्यांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी खासगी लॅब चालकांकडून दर मागविण्यात आले आहे. या लॅबने 24 तासात कोरोनाचा चाचणी अहवाल देणे आवश्‍यक असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. 

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये 60 टक्के कोरोनाचे रुग्ण तर कंटेन्मेंट झोनच्या बाहेर 40 टक्के रुग्ण आढळत आहे. यापूर्वी कंटेन्मेंट झोनच्या बाहेर कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे 15 ते 20 टक्के होते. ते आता वाढलेले आहे. यामुळे दर 15 दिवसांनी कंटेन्मेंट झोनचा आढावा घेण्यात येत होता. तो आता दर आठ दिवसांनी घेण्यात येणार आहे.

त्यानंतर दर शुक्रवारी कंटेन्मेंट झोन जाहीर केले जाणार असल्याचेही आयुक्त गायकवाड यांनी सांगितले. बालेवाडी स्टेडियम येथे कोरोनासाठी रुग्णालय उभारण्यात आले आहे. हे रुग्णालय मंगळवारपासून (दि.23) सुरू होणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT