Pune_Duplicate_Currency 
पुणे

विमाननगरमध्ये सापडल्या ४७ कोटींच्या बनावट नोटा; १ हजारच्या...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील एका घरातून छापा मारून 43 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या भारतीय तर चार कोटी रुपयांच्या परदेशी बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या चलनामध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. 

या कारवाईत सहा जणांना जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी एक आरोपी लष्कराशी संबंधित आहे. उर्वरीत पाचजण हवाल्याचा धंदा करणारे आहे. शेख अलिम समाद गुलाब खान (वय 36, रा. प्रतिकनगर, येरवडा), सुनिल सारडा (वय 40), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय 43), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय 18), रितेश रत्नाकर (वय 34) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय.28) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. शेख अलिम खान हा बॉम्बे सॅपर्स डेपो बटालियन खडकी येथे नाईक या पदावर कार्यरत आहे. याबाबत उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस उपआयुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी गुप्तचर यंत्रणेला नोटांची (एमआय) मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेने याबाबतची माहिती गुन्हे शाखेला दिली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. संबंधित सदनिकेत खोली भरून नोटा थप्पी असल्यामुळे रात्री उशीरापर्यत त्या मोजण्याचे काम सुरू होते. घरात नवीन दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा भरलेले बॉक्स खोलीभरून आढळून आले. नोटाबंदीनंतर  एक हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली होती. एक हजार रुपयांची बनावट नोट छापण्यामागचा टोळीचा नेमका हेतू काय? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणलेले चलन कोणाला देण्यात येणार होते तसेच बनावट चलनाची छपाई कोठे करण्यात आली, या दृष्टीने चौकशी करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत जप्त करण्यात आलेल्या बनावट चलनाची मोजदाद करण्याचे काम सुरू होते. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

नोटांवर चिल्डरन बँक ऑफ इंडिया असा शिक्का : 
नोटांची पाहणी केल्यानंतर त्या खेळण्यातील नोटा असल्याचे समोर आले. चिल्डरन बँक ऑफ इंडिया असा शिक्का देखील आहे. त्यामुळे या नोटा मुलांच्या खेळण्याच्या आहेत की त्याचा वापर करण्यात आला आहे, याचा तपास सुरू आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT