couple came to India for friend wedding got married in Pune in a Hindu wedding ceremony marathi News  
पुणे

Pune News : मित्राच्या लग्नाला आले अन् स्वत:च विवाह बंधनात अडकले! जर्मनीच्या जोडप्याचा हिंदू पध्दतीने विवाह सोहळा

Pune Latest News : श्रवण जर्मनीत राहत असल्याने जर्मनीतील त्याचे मित्र, मैत्रीणी लग्नापूर्वीच तीन चार दिवस पुण्यात आले होते.

समाधान काटे

शिवाजीनगर : जर्मनीच्या म्युनिच शहरात वास्तव्यास असलेले मुलगा लुकास स्टांग व मुलगी टेरेसा कोर्स हे दोघेजन मित्र श्रवण शिंदे व श्रध्दा पाटील यांच्या लग्नसाठी पुण्यात आले होते. शिंदे यांचे लग्न हिंदू धर्म पध्दतीने करण्यात येत होते. या लग्नातील हिंदू धार्मिक परंपरा , लग्नामध्ये पै-पाहुण्यांचा उत्साहाने असलेला सहभाग, हळद लावणे या गोष्टी भावल्याने त्यांनाही हिंदू पध्दतीने लग्न करण्याचा मोह आवरता आला नाही. लुकास व टेरेसा यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णन घेतला आणि हिंदू परंपरेप्रमाणे भटजी अशोक यांच्या साक्षीने विवाहसोहळा संपन्न झाला.

सेनापती बापट रस्त्यावरील रोहन गरिमा सोसायटीतील रहिवासी, संजय शिंदे यांचा मोठा मुलगा श्रवण हा जर्मनीत एका खाजगी कंनपनीत सात वर्षापासून नोकरीस आहे. श्रवण व श्रध्दा यांचे लग्न निशीगंधा जल महल, पिंपळोली (ता. मुळशी) या ठिकाणी २१ एप्रिल रोजी झाले. श्रवण जर्मनीत राहत असल्याने जर्मनीतील त्याचे मित्र, मैत्रीणी लग्नापूर्वीच तीन चार दिवस पुण्यात आले होते.

लग्नातील प्रत्येक कार्यात सर्वांचा सहभाग होता. मेंहदी काढणे, बांगड्या भरणे, साडी नेसणे, फेटा बांधणे, कपड्यांची खरेदी करणे अशा सर्व कार्यात विदेशी पाहुणे उत्साहाने सहभागी होते, धार्मिक विधीचे महत्व जाणून घेत होते. या पाहुण्यामध्ये मुलगा लुकास स्टांग व त्याची मैत्रीण टेरेसा कोर्स हे देखील सहभागी होते. लुकास हा जर्मनीत सरकारी नोकरी करतो तर टेरेसा ही एका महामंडळात नोकरी करते.

पुण्यात लग्नासाठी आल्यानंतर शनिवारवाडा, पेठ परिसर, सारसबाग आदी भागत ते फिरले, लक्ष्मी रस्त्यावरून भारतीय पारंपरिक वस्र, हातगाडीवरून कानातले, बांगड्या इतर साहित्य त्यानी खरेदी केले. पुण्यातील रिक्षाचा प्रवास, शनिवारवाडा त्यांना खूप आवडल्याचे सांगितले. लग्नाच्या दिवसी लुकास याने सकाळी बांधलेला फेटा रात्रीच उतरवला. लग्नमंडप, विधी, भटजी, होम, रांगोळी, फुलांच्या माळांनी सजवलेला परिसर पाहून लुकास व टेरेसा यांना लग्न करण्याचा मोह आवरता आला नाही. त्या दोघांनी श्रवण आणि श्रध्दाच्या लग्नकार्यात हिंदू धर्म पध्दतीने आपलेही लग्न पार पाडले.

''माझा मुलगा श्रवण व श्रद्धाच्या लग्ना मध्ये एक सुखद घटना घडली, श्रवणचे कॅनडा, जर्मनी,ब्राझील,येथील मित्र आले होते. त्या मध्ये जर्मनीचे टेरेसा व लुकास हे मित्र, मैत्रीण होते, त्यांना आपला विवाह सोहळा खुप आवडला त्यांनी येथेच हिंदू पध्दतीने लग्न करून घेण्या बद्दल विचार बोलून दाखवला व आम्ही लगेच त्याला होकार दिला. थोड्याच वेळात हार, अक्षदा, विधी सामानाची जमवा जमव केली. ब्राह्मण अशोकजी यांना विनंती करुन विधी मंडपात यथा योग्य हिंदू पध्दतीने लग्न लावून दिले. तो प्रसंग आमच्या मुलाच्या लग्ना सोबत अविस्मरणीय ठरला. ''

- संजय शिंदे, श्रवणचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

Prashant Kishor Challenges BJP : प्रशांत किशोर यांचं भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान; म्हणाले, ''हिंमत असेल तर...''

Latest Marathi News Live Update : परतीच्या पावसाचा डबल धक्का! पिंपळगावच्या शेतकऱ्यांचा कांदा पाण्याखाली, लाखोंचे नुकसान

मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनला पावसाचा फटका! मुंबई-पुणे प्रवासाचा ‘एक्सप्रेस’ स्वप्नाला धक्का; मिसिंग लिंक उशिरा पूर्ण होणार

Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT