Accident 
पुणे

इंदापूरजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; पुण्यातील दांपत्याचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

इंदापूर (पुणे) : इंदापूर-अकलूज राज्य मार्गावर विठ्ठलवाडी (ता.इंदापूर) येथील वळणावर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. अपघातात मृत पावलेले दांपत्य पुण्यात वास्तव्यास होते. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. हा अपघात रविवारी (ता.३) सकाळी पावणेआठ वाजता झाला असून अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला आहे.

कार चालक पांडुरंग सिताराम ताथवडे (वय ५८) आणि रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५०, दोन्ही रा. खडकी, पुणे, मूळ गाव- केंदूर पाबळ, ता. शिरुर, जि.पुणे) अशी अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. 

टाटा ट्रक (क्र.एम.एच १२ एम.व्ही.७४३४) हा बावडा बाजूकडून इंदापूरकडे भरधाव वेगाने जात असताना त्याची समोरून येणाऱ्या नेक्सॉन कार (क्र.एम.एच १२ आर.एफ.२६६२) ला जोरदार धडक बसली. त्यामुळे कार चालक आणि त्यांची पत्नी दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. परिणामी ते जागीच मरण पावले.

या अपघातात ट्रक आणि कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामुळे कारचे इंजिन बाहेर पडले आहे. अज्ञात ट्रक चालकाविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजित जाधव पुढील तपास करत आहेत.

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aryavir Sehwag Century: १७ चौकार अन् ७ षटकार... ज्युनियर सेहवागची दीडशतकी खेळी अन् शुभमन गिलच्या विक्रमाची केली बरोबरी

Viral Video : लेकीची दिवाळी साजरी करण्यासाठी आईने शेळी विकली...भावनिक व्हिडिओ व्हायरल

पुढच्या पाच दिवसांत ५ राशींचं नशीब चमकणार! वक्री शुक्र देणार भरभरून लाभ, उत्पन्नाचे नवे मार्गही खुलणार

Annasaheb Jolle Halsiddhnath Sugar Factory: निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याची २०२६-२७ हंगामासाठी ३७७० रुपये पहिली उचल जाहीर

Sonia Gandhi Book : "अजिबात नाही!"; भारताचे पंतप्रधानपद का नाकारले? अनेक वर्षांनंतर गांधी घराण्यातील 'त्या' निर्णयामागचे सत्य उघड!

SCROLL FOR NEXT