court cross complaint cases both parties can get punished
court cross complaint cases both parties can get punished 
पुणे

'क्रॉस कंप्लेंट'च्या खटल्यात तडजोड झाली तर सुटका अन्यथा...

सनिल गाडेकर

पुणे : मतभेदाचे रूपांतर भांडणात होऊन त्यातून एकमेकांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात तडजोडही होऊ शकते. मात्र ती झाली नाही व साक्ष-पुराव्यातून गुन्हा सिद्ध झाल्यास दोन्ही पक्षांना किंवा अन्याय करणाऱ्या एकाला शिक्षा भोगावी लागते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवीगाळ, मारहाण, हाणामारीत झालेला विनयभंग अशा प्रकरणात एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे प्रकार नियमित घडत असतात. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची तीव्रता कमी व्हावी किंवा खरोखरच अन्याय झाला आहे, म्हणून क्रॉस कंप्लेंट दाखल करण्यात येत असतात. समोरच्या पक्षापेक्षा आपण दाखल करत असलेल्या फिर्यादीत अधिक खडक कलमांचा समावेश करून घेण्यासाठी तक्रारदार प्रयत्नशील असतो. कारण समोरच्याला किती शिक्षा होणार हे त्या कलमांच्या आधारे ठरत असते. अशा प्रकारच्या खटल्याबाबत ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी सांगितले की, परस्पर विरोधी दाखल तक्रारीचे खटले एकाच न्यायालयात बरोबर चालवले जातात. एक गुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दुसरा गुन्हा सत्र न्यायालयातील कक्षेत असेल तर दोन्ही खटले सत्र न्यायालयात वर्ग करून दोघांचीही बरोबर सुनावणी होते. दोन्ही खटल्यात पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालय योग्य निर्णय देत असते. साक्षी-पुराव्यात दोषी आढळल्यास दोघांनाही किंवा एकाला शिक्षा करण्यात येते किंवा दंड करून सोडण्यात येते. प्रकरणानुसार न्यायालय निकाल देते. शहरातील एकूण गुन्ह्याचा आकडा लक्षात घेता परस्पर विरोधी दाखल होणाऱ्या तक्रारी कमी आहेत.

तर तडजोड होऊ शकते : 
दोन्ही पक्षकरांमध्ये तडजोड झाली तरी हे खटले न्यायालयात चालवून मिटवून घ्यावे लागतात. अशा प्रकारचे सुमारे पन्नास टक्के खटले मिटवून घेतले जातात. एकमेकांना शिक्षा होऊ नये म्हणून त्या पद्धतीची साक्ष न्यायालयात दिली जाते किंवा गैरसमजुतीतून गुन्हा दाखल झाला, असे सांगितले जाते. त्यामुळे दोघांनाही शिक्षा होत नाही.

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर

''गुन्ह्याची पार्श्‍वभूमी काय आहे व याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र काय सांगते यावरून आरोपींवर कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल करायचा आहे हे पोलिस ठरवत असतात. परस्पर विरोधी तक्रारीच्या प्रकरणात पोलिसांनी आधी थोडी शहानिशा करून तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.''
- अॅड. हर्षद निंबाळकरसदस्य, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT