civil-court-pune 
पुणे

पुण्यात न्यायालयांचे कामकाज मंगळवारपासून सुरू होणार

प्रलंबित दाव्यांच्या सुनावणीला मिळणार गती

सनिल गाडेकर

पुणे : केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू असल्याने इतर दाव्यांना पुढील तारखा मिळणे आता थांबणार आहे. मंगळवार (ता. १५) पासून शहरातील सर्व प्रकारच्या न्यायालयांचे कामकाज दिवसभर (सकाळी ११ ते सायंकाळी ५.३०) पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रलंबित आणि नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील न्यायालये पूर्ण वेळ सुरू करण्यात मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील न्यायालये पूर्वीप्रमाणे एकाच शिफ्टमध्ये सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेतच सुरू राहणार आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्यात टप्प्याटप्याने अनलॉक सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आता पुणे महानगरपालिका हद्दीत न्यायालयाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बाबतच्या सूचना मुंबर्इ उच्च न्यायालयाकडून जिल्हा न्यायालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कामकाजाची वेळ कशी असेल याबाबतचे परिपत्रक प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी काढले आहे. न्यायालये पूर्ण दिवस चालू होणार असले तरी कॅन्टीन मात्र बंद राहणार आहे. तसेच सर्व बार रूम्स ५० टक्के आसन क्षमतेने उघडे ठेवण्यात येणार आहे. तर बार रूम्स व टेबल स्पेसच्या ठिकाणी पक्षकारांना बोलाविण्यास परवानगी देण्यात आलेले नाही.

''प्रमुख जिल्हा न्यायाधीशांबरोबर सोमवारी मीटिंग झाली आहे. उच्च न्यायालयाने प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार न्यायालय सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे जिल्हा न्यायाधीशांना कळविलेले आहे. त्याप्रमाणे पुणे शहरातील न्यायालये उद्यापासून पूर्ण दिवस व पूर्ण क्षमतेने चालू होणार आहेत.''

- अॅड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

ही न्यायालये होणार सुरू :

  • जिल्हा न्यायालयातील सर्व कोर्ट हॉल

  • कौटुंबिक न्यायालय

  • - कामगार न्यायालय

  • - औद्योगिक न्यायालय

  • - ग्राहक आयोग

  • - सहकारी न्यायालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दीड वर्षांनंतर नरेंद्र मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! तिकडे अमेरिकेच्या कारवाईत तीन भारतीयांचा मृत्यू; देशात संताप

VIDEO : तुकाराम मुंढे यांचं रक्त काढून...! माजी राज्यमंत्र्याची अजब मागणी, मुख्य सचिवांना लिहिलं पत्र...

Vidhan Parishad Election : मतदानाला काही तास शिल्लक, काँग्रेस उमेदवाराचा डिजिटल प्रचार, पण पक्षाची भूमिका वेगळीच, नेमकं घडतंय काय?

Latest Marathi News Live Update : अमरावती काँग्रेसची पुन्हा बैठक सुरू, वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार?

Waste Project Tender Issue : दक्षताच्या सूचना झुगारुन कचरा प्रकल्पाची निविदा; ठरावीक ठेकादारांना पायघड्या

SCROLL FOR NEXT