Ajit Pawar 
पुणे

पुण्यात कडक लॉकडाऊन? हायकोर्टाच्या सूचनेवर अजित पवार काय म्हणाले

ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीर व्हॅसीनसाठी धाव पळ होऊन नये त्यासाठी पायाभूत उभे करण्याची गरज आहे. ते काम हाती घेतले आहे. यातील अडचणी सोडविण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीर व्हॅसीनसाठी धाव पळ होऊन नये त्यासाठी पायाभूत उभे करण्याची गरज आहे. ते काम हाती घेतले आहे. यातील अडचणी सोडविण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

पुणे - जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरची उपलब्धता जेमतेम असून, कोरोना प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही. यावर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ऑक्सिजन ऑडीट सह अनेक बारकाव्यावर आज चर्चा झाली. यासंबंधी खासदार आणि आमदारांकडून सुचना आल्या आहेत. ऑक्सिजन, रेमेडिसिव्हीर व्हॅसीनसाठी धाव पळ होऊन नये त्यासाठी पायाभूत उभे करण्याची गरज आहे. ते काम हाती घेतले आहे. यातील अडचणी सोडविण्याचे काम सध्या सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

1 मेपासून केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरु केली आहे. राज्याकडे मात्र पुरेसा साठा नसल्यानं अद्याप या टप्प्यातले लसीकरण केले जात नाही. याबाबत सांगताना अजित पवार म्हणाले की, 18-45 राज्य सरकारकडून लस द्यायचे होते, पण पुरवठा कमी आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. हा पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. आदर पुनावला हे पुढचे काही दिवस तरी भारतात नाहीत. लशीच्या पुरवठयाबाबत आदर पुनावालांशी संपर्क केला आहे असंही अजित पवार यांनी म्हटले.

भारत सरकारने 18-45 राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात आला. बऱ्याच जणांना पहिला डोस घेतला आणि पण दुसरा डोस मिळत नसल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. दुसरा डोस वेळेत देण्याची गरज, विलंब होऊ नये साठी प्रयत्न केले जात आहेत. लस दरात केंद्र सरकाराला दिली आहे त्याच दरात राज्य सरकारला मिळावी यासाठी प्रयत्न करु असंही अजित पवार यांनी सांगितलं.

पुण्यात लॉकडाऊन करण्याबाबत हायकोर्टाने सूचना केल्या आहेत. त्याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने मुंबईचे कौतुक केले. दरम्यान, पुण्यातील लॉकडाऊनबाबत जे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं त्यासाठी देण्यात आलेली आक़डेवारी ही पुणे शहर, पिंपरी आणि पुणे जिल्हा ग्रामीणची होती. त्यावरून न्यायाधीशांनी मत व्यक्त केलं होतं. सध्या पुण्यात जे कडक निर्बंध लागू आहेत, लॉकडाऊन करण्यात येणार नाही पण निर्बंध आणखी कडक केले जातील. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या जास्त आहेत. पुण्यात रुग्ण वाढलेले नाहीत. पिंपरीतही तसाच प्रकार आहे. अधिक लक्ष देण्याची गरज आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितलं आहे की पुण्यात कडक लॉकडाऊन केलं पाहिजे. त्यां नी सूचना केल्यात. त्यांना अधिकार आहे. सध्या असलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी योग्य झाली तर कोरोना नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल असंही अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT