Covid-Kavach
Covid-Kavach 
पुणे

कोरोना औषधांच्या चाचणीसाठी ‘कोविड कवच’

सकाळवृत्तसेवा

पुणे - औषधांच्या वैद्यकीय चाचण्यांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने संकलित करण्यासाठी पुण्यातील संशोधकांनी ‘कोविड कवच’ नावाचे ॲप विकसित केले आहे. आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) पुढाकारातून विकसित करण्यात आलेले हे ॲप कोरोना उपचारातील आयुर्वेदिक औषधांच्या चाचण्यांसाठी वापरण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) द्वारे आयोजित ‘इंजिनिअरिंग एक्‍सेलंस ॲवॉर्ड’चे विजेते दिमाख सहस्रबुद्धे यांनी हे ॲप विकसित केले आहे. पुण्याच्या ऱ्हुमोटाईड आजार केंद्राचे (सीआरडी) संचालक डॉ. अरविंद चोप्रा यांच्या संकल्पनेतून हे ॲप निर्माण झाले आहे. ॲपद्वारे दररोज व्यक्तीच्या लक्षणांचे निरीक्षण आणि निदान चाचणीत ‘रिअल टाइम डेटा’ उपलब्ध करून देणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय ज्ञानाच्या एकत्रित वापरातून एक उत्तम उत्पादन समोर आले आहे.

ॲपची वैशिष्ट्ये
1) ॲपधारकाची वैयक्तिक माहिती गोपनीय 
2) डॉक्‍टरांचा वेळ वाचणार आणि रुग्णाशी रोज संपर्क राहणार
3) रिमोट पद्धतीने रुग्णावर पाळत ठेवणे शक्‍य
4) तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित
5) कोरोनासोबत इतर संसर्गजन्य आजारांसाठी वापरणे शक्‍य

काय आहे ॲप?
औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या दररोजच्या आरोग्याची माहिती संकलित करणारे हे एक मोबाईल ॲप आहे. यामध्ये ॲपधारक रोज स्वतःच्या लक्षणांची (ताप, सर्दी-खोकला आदी) नोंद करू शकतात. त्यामुळे डॉक्‍टरांना रोज भेट देण्याची गरज नाही. संकलित माहितीचे पृथक्करण केल्यानंतर त्या आधारे निष्कर्ष काढणे सहज शक्‍य आहे. 

समाजातील कोरोना रुग्णांवर पाळत ठेवणे सोपे होते. यामुळे औषधोपचाराची नियमावली सुधारणे, लवकरात लवकर निदान करणे व आवश्‍यक उपचार देणे शक्‍य होणार आहे. अभ्यासाचे विश्‍लेषण काढण्यास सोईस्कर असे ॲपचे डिझाइन करण्यात आले आहे.
- डॉ. अरविंद चोप्रा, संचालक, सीआरडी

कोविड कवच ॲपमध्ये १०० टक्के गोपनीयतेची काळजी घेतली जाते. रुग्ण व डॉक्‍टर यांच्यातील संवाद हा केवळ त्यांच्यातच राहील. सध्या या ॲपचे दुसऱ्या स्तरावरील परीक्षण झाले आहे.
- दिमाख सहस्रबुद्धे, संशोधक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT