covishield-vaccine 
पुणे

लशीच्या वापरासाठी आता सिरमचाही अर्ज 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना प्रतिबंधासाठी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित होणाऱ्या "कोविशिल्ड' लसीचा वापर करण्याची मंजुरी मागणारा अर्ज सोमवारी करण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत लसीच्या वापरासाठी हा अर्ज केला असून, त्यावर पुढील दोन आठवड्यांमध्ये भारताचे औषध नियंत्रक (डीसीजीआय) निर्णय घेतील, अशी माहिती या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी सकाळशी बोलताना दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविशिल्ड या "कोविड 19' विषाणू प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी पुण्यात 26 ऑगस्ट रोजी भारती हॉस्पिटलमध्ये झाली. गेल्या चार महिन्यांमध्ये देशभरातील शंभर स्वयंसेवकांवर लसीच्या सुरक्षिततेची आणि एक हजार 800 स्वयंसेवकांवर परिणामकारकता तपासणारी मानवी चाचणी करण्यात आली. 

ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी, ऍस्ट्रॅझेनेका आणि पुण्याची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन लस निर्माण केली आहे. त्यासाठी चिंपांगी अँडिनो व्हायरस याच्याशी बायो इंजिनियरिंगच्या माध्यमातून संयोग करून ही लस तयार करण्यात आली आहे. त्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळविणारा अर्ज डीसीजीआयकडे करण्यात आला. 

देशभरात कोरोनामुळे रोजच्या रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा विचार करून लसीला मंजुरी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली आहे. 

यापूर्वी अमेरिकेतील औषध निर्माता असलेल्या फायजर कंपनीने लस वापरासाठी डीसीजीआयकडे अर्ज केला आहे. त्या पाठोपाठ आता सिरम इंन्स्टिट्युटनेही असाच अर्ज दाखल केल्याची अधिकृतपणे सांगण्यात आले. 

कोविशिल्ड लसीबद्दल मानवी चाचणी करण्यात येत असेलल्या चेन्नईतील एका स्वयंसेवकाने आरोप केले होते. हे सर्व आरोप सिरम इन्स्टिट्यूटने फेटाळले. मात्र, या कोविशिल्ड लसीच्या वापराला परवानगी देण्यापूर्वी या प्रकरणाची सत्यता पडताळली जाईल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

अखेर बी.एड सीईटी झालीच नाही; सीईटी सेलचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांचा गोंधळ, शेकडो विद्यार्थी मुकले परीक्षेला

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

SCROLL FOR NEXT