doctor
doctor 
पुणे

कोरोना रुग्णांवर उपचार न करणाऱ्या डॅाक्टरवर अखेर गु्न्हा दाखल

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना तीन कोरोनाबाधितांवर उपचार करण्यास नकार दिल्याप्रकरणी दौंड शहरातील पिरॅमिड रूग्णालयाचे प्रमुख डॅा. समीर कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूग्णांवर उपचारास नकार दिल्याची बाब आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. 

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर
                  
शासनाने कोरोनाबाधितांवर उपचार करण्याकरिता दौंड शहरातील राजमाता अहल्यादेवी सहकार चौकातील पिरॅमिड रूग्णालयाचे अधिग्रहण केले आहे. दौंड उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी २९ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत दौंड तालुक्यातील तीन कोरोनाबाधितांना पिरॅमिड रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले होते. परंतु डॅा. समीर कुलकर्णी यांनी या बाधितांवर उपचारास नकार देत त्यांना दाखल देखील करून घेतले नाही. रूग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या रूग्णालयांचे परवाने रद्द करणे व अन्य मागण्यांसाठी दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीबाहेर माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक माने, सुरेश वाघमारे व राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत धनवे यांनी धरणे आंदोलन केले होते.

दरम्यान, याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या निर्देशानुसार डॅा. संग्राम डांगे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. उपचारास नकार देण्यात आलेल्या कोरोनाबाधितांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरणार असल्याचे माहित असतानाही डॅा. समीर कुलकर्णी यांनी त्यांना रूग्णालयाच्या बाहेर ठेवून कोरोना विषाणूचा प्रसार करण्यास मदत केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 
                
या फिर्यादीनुसार डॅा. समीर एस. कुलकर्णी (रा. दौंड) यांच्याविरूध्द साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार आणि भारतीय दंड विधान मधील कलम २६९ (जीवितास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती करणे) व कलम १८८ (आदेशाची अवज्ञा करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार दिलीप भाकरे हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT