पुणे

खाद्य तेलाचे वाटप करणे पडले महागात; पॅनेल प्रमुखावर गुन्हा

रवींद्र पाटे

नारायणगाव  : वडगाव  (भोरवाडी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करावे या साठी मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने खाद्य तेलाचे कॅड वाटप करून निवडणुक आचारसंहितेच भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

या प्रकरणी महाविकास आघाडी पॅनेलचे कुंडलिक रामभाऊ सोनवणे, साहिल अनिल भोर (रा. भोरवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत गुंड म्हणाले आरोपींनी वडगाव (भोरवाडी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पॅनल तयार केला आहे. गुरुवारी (ता. १४) रात्री आरोपी मतदारांना साहित्य वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या नुसार पोलीस कर्मचारी योगेश गारगोटे यांनी भोरवाडी येथे जाऊन तपास केला.

दरम्यान, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी देविदास दगडू भोर यांना पाच लिटर मापाचे सुपर सोया कंपनीचे तेलाचे तीन कँड (किंमत१५००/-रू) देत असताना आढळून आले.या प्रकरणी कुंडलिक  सोनवणे, साहिल भोर यांच्यावर भा.द.वि कलम १७१(इ),१८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT