Crime Daughter-in-law killed over minor dispute mother-in-law arrested police pune
Crime Daughter-in-law killed over minor dispute mother-in-law arrested police pune esakal
पुणे

Crime News : किरकोळ वादातून सुनेचा खून, सासूला अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : किरकोळ कारणावरून सासूने सुनेचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना लोहगाव परिसरात मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी पोलिसांनी सासूला अटक केली आहे.

रितू रवींद्र माळवी (वय २८, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या सुनेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक समू चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिसांनी सासू कमला माळवी (वय ४९) हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रितू माळवी या महिलेला डोक्याला मार लागल्यामुळे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी सासूने रितूचा पाय घसरून ती बेशुद्ध झाल्याचा बनाव रचला. परंतु काहीतरी घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांना आला.

त्याअनुषंगाने पोलिसांनी सासूकडे चौकशी केली असता, सून रितू ही घरात स्वयंपाक करीत नाही, तसेच नातवाला व्यवस्थित सांभाळत नाही, यावरून सासू-सुनेमध्ये सतत वाद व्हायचा. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास सासू दूध घेण्यासाठी फ्रिज उघडत असताना तिचा पाय सुनेला लागला. त्यामुळे सुनेने शिवीगाळ केली.

या कारणावरून दोघींमध्ये झालेल्या भांडणात सासूने रितूला मारहाण केली. या मारहाणीत रितू फरशीवर पडल्यानंतर सासूने तिच्या केसाला पकडून डोके जमिनीवर आपटले. त्यात सुनेचा मृत्यू झाला. रितूला आठ वर्षांचा एक मुलगा असून, पती आजारी असल्यामुळे तो घरीच असतो.

पोलिसांनी या गुन्ह्याचा २४ तासांत छडा लावून सासूला अटक केली. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT