Crime 
पुणे

गुन्हेगारांना जामीन आणि पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला; पण...

सनील गाडेकर

शहरात ५६७ आरोपींना जामीन; २३६ जणांना पॅरोल 
पुणे - गुन्हेगारांना एकमेकांची साथ मिळाली की त्यातून गुन्हेगारी वाढतेच. त्यात आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील आरोपी व गुन्हेगारांना जामीन आणि पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोनासह गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरावीक गुन्ह्यातील आरोपी किंवा गुन्हेगारांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ५६७ आरोपींना तात्पुरत्या जामिनावर, तर २३६ गुन्हेगारांना पॅरोलवर सोडले आहे. 

गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकारी झटत आहेत. असे असतानाही कारागृहातून सुटलेल्या आरोपींमुळे उद्‌भवणाऱ्या गुन्ह्यांना थांबविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. 
एक आरोपी तात्पुरत्या जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रतिस्पर्ध्या गॅंगने त्याचा काही तासांतच खून केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. त्यामुळे गुन्हेगारी कमी झाली, असे दिसून येत नाही.

याबाबत पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार म्हणाले, ‘‘कारागृहातील गुन्हेगारांना सोडले तर सामाजिक स्वास्थ्य धोक्‍यात येऊ शकते. सध्या न्यायालयाचे कामकाज मर्यादित मनुष्यबळावर सुरू आहे. पोलिसांवरचा ताण वाढू द्यायचा नसेल तर सरकार, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने चांगल्या उपाययोजना करणे 
गरजेचे आहे.’’

ॲड. राहुल दिंडोकर म्हणाले, की पोलिसांवर प्रचंड ताण असतानाही गुन्हेगारी रोखण्याचे त्यांचे काम सुरूच आहे. सराईत आणि संघटित गुन्ह्यांमधील आरोपी किंवा गुन्हेगार बाहेर आले तर तेढ निर्माण होऊ शकते. ज्या गुन्हेगारांना सोडले आहे, त्यांना परत  आणण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Katraj News : कात्रज घाटात वनविभागाची ‘कुऱ्हाड’; १००० झाडांची कत्तल, तीन एकर परिसर भुईसपाट

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Ambajogai Theft : अंबाजोगाईत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पडदाफाश! ५० सीसीटीव्ही चाळले, जिथे वाटा केला तिथल्या तळ्यात कपडे फेकले; अन् एलसीबीच्या जाळ्यात दोघे अडकले

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

SCROLL FOR NEXT