crime news pretense KYC of State Bank of India Nine lakh fraud of senior citizen pune
crime news pretense KYC of State Bank of India Nine lakh fraud of senior citizen pune  sakal
पुणे

केवायसी अद्ययावत करण्याचा बहाणा करुन ज्येष्ठ नागरीकाची नऊ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्टेट बॅंक ऑफ इंडियाची (एसबीआय) केवायसी माहिती अद्ययावत करण्याचा बहाणा करुन चौघांनी एका ज्येष्ठ नागरीकाची पावणे नऊ लाख रुपयांची फसवणुक केली. हि घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र सिंग (रा. पश्‍चिम बंगाल), सिताराम चौधरी (रा. पश्‍चिम बंगाल), मेघा शॉर्टस इंटरनेट प्रा. लि. या कंपनीचा शैलेशकुमार खेताभाई धारजी व एका मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश दुलादिनोमल असनानी (वय 68 रा.बाणेर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असनानी यांच्या मोबाईलवर शुक्रवारी केवायसी अपडेट करण्याबाबतचा मेसेज आला. केवायसी संदर्भातील मेसेज असल्यामुळे फिर्यादींनी त्यास तत्काळ प्रतिसाद दिला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवर लिंक पाठवून त्यांना ती लिंक उघडण्यास सांगितले. दरम्यान, त्यांनी फिर्यादीकडून ओटीपी क्रमांक घेऊन त्यांच्या बॅंक खात्यातील पावणे नऊ लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन माध्यमाद्वारे आपल्या खात्यामध्ये वर्ग करुन घेतली. दरम्यान, आपली फसवणु झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, त्यांच्या अर्जाची चौकशी केल्यानंतर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फसवणुक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

  • अनोळखी व्यक्तींचे मेसेज, लिंक्‍स, फ्रेंड रिक्वेस्टला प्रतिसाद देणे टाळा

  • बॅंक किंवा स्वतःसंबंधीची गोपनीय माहिती कोणाला देऊ नका

  • केवायसी, कर्जफेड, बॅंकेसंबंधीच्या मेसेजबाबत थेट बॅंकेत जाऊन विचारणा करा

  • स्वतःची किंवा कुटुंबाची गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तिच्या सांगण्यावरुन आर्थिक व्यवहार करु नका

  • कोणाशीही ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना कुटुंबातील सदस्यांना कल्पना द्या.

  • कोणत्याही प्रकारचे क्‍युआर कोड स्कॅन करू नका, लिंक उघडू नका

फसवणुक झाल्यास किंवा टाळण्यासाठी इथे साधा संपर्क -

  • सायबर पोलिस व्हॉटस्‌अप क्रमांक - 7058719371, 7058719375

  • सायबर पोलिस ठाणे - 020-29710097

  • ई-मेल - crimecyber.pune@nic.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT